वारकरी परंपरेचा अपमान सहन केला जाणार नाही

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
-विहिंपचा इशारा
-परंपरेचा सन्मान राखा
-श्रीरामपंत जोशी यांचे आवाहन

नागपूर, 
वारकरी परंपरेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा सक्त इशारा देत वारकरी संप्रदायाची माफी न मागितल्यास संत व विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल, असा सक्त इशारा Vishva Hindu Parishad विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. या पृष्ठभूमिवर धंतोलीमधील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात पत्रकार परिषद झाली. श्रीरामपंत जोशी महाराज यांनी वारकरी संप्रदायाची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) प्रवक्ते विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायातील मान्यवर महाराजांविषयी केलेल्या विधानाबाबत वारकरी संप्रदायात तीव्र नाराजी व्यक्तकरण्यात येत असल्याचे सांगितले.
 
 
vhp
 
ते म्हणाले की, वारकरी परंपरा ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक जीवनाचा भाग असून, संत परंपरेच्या मूल्यांवर आधारित ही परंपरा समाजात सद््भाव, समता व भक्तीचा संदेश देत आली आहे. वारकरी संप्रदायाच्या वतीने स्पष्ट करण्यात येते की, संत व महाराजांविषयी अशा प्रकारची विधाने केवळ भाविकांच्या भावना दुखावणारी नसून, समाजातील सांस्कृतिक ऐक्यालाही धक्का देणारी आहेत. घुसखोरी केल्याचा आरोप करून त्यांनी जी नावे जाहीर केली, प्रमाण द्यायला हवे. कुठलेही संशोधन न करता असे करणे दुर्दैवी आहे. वारकरी परंपरा ही कोणत्याही भेदभावापलीकडे जाऊन मानवतेचा संदेश देणारी असून, अशा परंपरेचा सन्मान राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
 
 
Vishva Hindu Parishad ‘भले तरि देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी हाणू काठी’ या संत तुकारामांच्या अभंगाचीही त्यांनी आठवण करून दिली. वारकरी समाजाची माफी न मागितल्यास संत आणि विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरेल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे यांनी दिला. प्रांत उपाध्यक्ष नंदकिशोर दंडारे, वारकरी संस्थेचे अध्यक्ष संदीप कोहळे, रामकृष्ण हरी आश्रम आळंदीचे उपाध्यक्ष रमेश वनकर, निरंजन रिसालदार, विहिंपचे प्रांत धर्माचार्य संपर्क प्रमुख धनंजय महाराज वासाडे, उपस्थित होते.