यवतमाळकरांना पाणीटंचाईतून मिळणार दिलासा

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
आमदारांनी घेतली वीज आणि पाणीपुरवठा विभागाची बैठक

यवतमाळ, 
शहराला Water supply पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांमधील पाणी उपसा प्रक्रियेत वीज पुरवठ्यामुळे येणारे अडथळे दूर करण्यासाठी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या पुढाकाराने आढावा बैठक पार पडली. यवतमाळ शहराला बेंबळा, चापडोह व निळोणा या तीन धरणांमधून नियमित पाणीपुरवठा केला जातो. मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणीपुरवठा विस्कळीत होण्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या समस्यांच्या मुळाशी विद्युत पुरवठ्यातील अनियमितता असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
 
 
water
 
महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोळी यांच्या दालनात झालेल्या या बैठकीत आ. बाळासाहेब मांगुळकर यांनी दोन्ही विभागांच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे, उमक, कांबळे तसेच विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता चव्हाण, उपअभियंता राठोड आणि विविध झोनचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत प्रामुख्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे पंपिंग स्टेशनचे काम कसे थांबते आणि त्याचा परिणाम शहराच्या पाणी वितरणावर कसा होतो, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
 
 
Water supply यावेळी केवळ तांत्रिक मुद्यांवरच चर्चा झाली नाही, तर लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या व्यथाही मांडल्या. नगर परिषदेच्या गटनेत्या वैशाली सवई, शहराध्यक्ष बबलू देशमुख, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे आणि अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष जाफर यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाèया पाणीटंचाईबाबत अधिकाèयांना जाब विचारला. नागरिकांना भर उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, यासाठी विद्युत मंडळाने आपला पुरवठा अखंडित ठेवावा आणि जीवन प्राधिकरणाने त्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
बैठकीच्या अंती, पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश देण्यात आले. दोन्ही विभागांनी परस्परांशी समन्वय साधून काम करावे आणि तांत्रिक बिघाड झाल्यास तो युद्धपातळीवर दुरुस्त करावा, अशा सूचना संबंधित अधिकाèयांना देण्यात आल्या. उन्हाळ्याच्या काळात प्रशासकीय यंत्रणा सतर्क राहून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. या निर्णयामुळे आगामी काळात यवतमाळकरांना नियमित पाणीपुरवठा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
पाणी नियमित मिळावे ही प्राथमिकता
शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, ही आमची प्राथमिकता आहे. विद्युत विभागाने तांत्रिक त्रुटी दूर कराव्यात आणि जीवन प्राधिकरणाने नियोजित पाणीपुरवठा करावा, अशा कडक सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासन यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे.
बाळासाहेब मांगुळकर
आमदार, यवतमाळ विधानसभा