महिलेवर अत्याचार; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

    दिनांक :20-Apr-2026
Total Views |
हिंगणघाट, 
woman-raped : तालुक्यातील छोटी वणी येथे भाड्याच्या घरात राहणार्‍या महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धकादायक प्रकार तक्रारीनंतर उघडकीस आला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी प्रवीण करपे (३६) रा. छोटी वणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
 

K  
 
 
 
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती. आरोपीने संधी साधून महिलेवर जबरी अत्याचार केला. शिवाय कुणालाही घटनेची माहिती दिल्यास ठार करण्याची धमकी देत तिचे शारीरिक शोषण केल्याचे तक्रारीत नमुद असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणातील महिलेच्या सहनशतीचा बांध फुटल्यावर तिने थेट हिंगणघाट पोलिस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला १९ रोजी अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक पद्माकर मुडे करीत आहे.