लव्ह जिहाद’ प्रकरणावरून नवा वाद

पीडित कुटुंबालाच महापालिकेची नोटीस

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
पुणे
Love jihad शहरातील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाने नवे वादळ निर्माण केले असून, या प्रकरणातील पीडित मुलीच्या कुटुंबालाच पुणे महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या कारवाईवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, पीडित कुटुंबाला लक्ष्य केल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे.

Love jihad case Pune 
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस ठाण्यात एका तरुणीने कथित ‘लव्ह जिहाद’ संदर्भात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी सुरू असतानाच महापालिकेच्या बांधकाम विभागाने संबंधित मुलीच्या वडिलांच्या घराला अनधिकृत बांधकामाची नोटीस पाठवली. ही नोटीस ऑनलाइन तक्रारीच्या आधारे १६ एप्रिल रोजी बजावण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईवर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी तीव्र आक्षेप घेत महापालिका प्रशासनावर थेट आरोप केले. “पीडित कुटुंबालाच टार्गेट करून ही नोटीस देण्यात आली आहे. परिसरातील इतर कोणत्याही घरावर अशी कारवाई झाली नाही. ही कारवाई राजकीय द्वेषातून केली गेली असावी,” असा आरोप त्यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत केला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.सभागृहात या मुद्द्यावरून वातावरण चांगलेच तापले होते. विरोधकांनी प्रशासनाची बाजू घेत या कारवाईचा संबंध नियमित प्रक्रियेशी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला, तर भाजपने यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोप कायम ठेवला. परिणामी, या प्रकरणाला स्पष्ट राजकीय रंग चढल्याचे दिसून आले.
दरम्यान, पीडित Love jihad  कुटुंबीयांवर मानसिक छळ सुरू असल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. तक्रार दाखल केल्यानंतर लगेचच घरावर नोटीस येणे ही बाब संशयास्पद असल्याचे मत काही स्थानिकांनी व्यक्त केले आहे. या सर्व घडामोडींमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणामुळे ‘लव्ह जिहाद’सारख्या संवेदनशील विषयावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, महापालिकेची भूमिका, पोलिसांची चौकशी आणि शासनाची पुढील भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.