अल्पवयीन मुलींची विक्री

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
(राळेगाव फाईल्स..)
देह व्यापारासाठी वापर आणि मानव तस्करी
दोषींवर कठोर कारवाई करा
आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाची मागणी

राळेगाव, 
Human trafficking caseअल्पवयीन मुलींची विक्री, देह व्यापारासाठी वापर व मानव तस्करी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याकरिता आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद व राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सोमवार, 20 एप्रिलला वडकी पोलिस ठाण्यावर धडक देत निवेदन दिले. राळेगाव शहर परिसरात काही इसामांमार्फत अल्पवयीन मुलींना फूस लावून बाहेर राज्यात विकणे, त्यांचा देह व्यापारासाठी वापर करणे आणि मानव तस्करीसारखे अतिशय गंभीर व अमानुष प्रकार सुरू असल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. हा प्रकार समाजासाठी अत्यंत घातक असून निरपराध मुलींच्या आयुष्याशी खेळ करणारा आहे.
 
 
magani
 
अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालक व नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित दोषी व्यक्ती, टोळ्या व त्यांना मदत करणाèयांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. भविष्यात असे प्रकार घडू नयेत, यासाठी विशेष पथक नेमून लक्ष ठेवण्यात यावे. अल्पवयीन मुलींचे संरक्षण, सुरक्षितता व न्याय मिळावा यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेतर्फे वडकी पोलिस ठाण्यात देण्यात आले. यावेळी निवेदन देताना राष्ट्रीय बजरंग दल जिल्हा उपाध्यक्ष कुणाल केराम, जिल्हा संपर्कप्रमुख तेजस चोपडा, सूरज बोथले, रोशन घोडाम, सुमीत फुन्ने, यश मडावी, प्रवीण राऊत, रामजी कुलसंगे, बिट्टू जंगिलवार, अक्षय ढेकणे, तुषार तेलंगे, देवांशू हिवरकर, यश उईके, प्रशांत हिवरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
बेपत्ता मुलींची सखोल चौकशी करावी
भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांची मागणी
राळेगाव परिसरातील मानवी तस्करीचे प्रकरण खूप खोल असून, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांनी मंगळवार, 21 एप्रिल रोजी केली. नगरसेवक रेखा कोठेकर व सरचिटणीस राजू पडगिलवार यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते.
 
 
chauhan
 

Human trafficking case  यावेळी अ‍ॅड. चौहान पुढे म्हणाले, आदिवासीबहुल भागातून 34 मुली बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप 17 एप्रिलला व्हायरल झाली होती. त्याच दरम्यान मला एक फोन आला. त्यात एक अल्पवयीन मुलगी संकटात असल्याचे समजले. त्या मुलीला सोडविण्यात आले असून, त्या मुलीचे वय कमी होते. मात्र, तिचे लग्न ज्या व्यक्तीसोबत लावून देण्यात येत होते. त्याचे वय 44 वर्षाचे होते. त्याच्यासह इतर व्यक्तींवर संबंधित विभागाने कारवाई केली आहे. व्हायरल झालेली क्लिप आणि या प्रकरणाचा काही संबंध आहे, का याची पोलिसांनी चौकशी करावी. आता याच प्रकरणाची दुसरी ऑडिओ क्लिपसुद्धा समोर आली आहे. यात संबंधित मुलगी असे प्रकरण झाल्याचे मान्य करत आहे, असेही ते म्हणाले. त्याचसोबत ही टोळी बनावट आधार कार्ड बनवून मुलींची विक्री करत असल्याचेसुद्धा त्यांनी सांगितले. मात्र, पोलिस चौकशीत पीडिता किंवा त्यांचे कुटुंबीय पाहिजे तसा प्रतिसाद देत नसल्याचे समोर येत आहे. व्हायरल झालेल्या दोन्ही ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी मजहर कुरेशी याचे नाव येत आहे. त्यामुळे प्रकरण खूप खोल असून, या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.