८३ वर्षांच्या आजीबाईंची पॅनक्रियाटिक कॅन्सरवर यशस्वी मात

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
pancreatic-cancer : आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८३ वर्षीय अशक्त आजीबाईंनी जिद्द आणि आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या मदतीने पॅनक्रियाटिक (अग्न्याशय) कॅन्सरवर मात केली.
 
 
K L;
 
 
 
सतत पोटदुखीच्या तक्रारींमुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर तपासणीत त्यांना बॉर्डरलाइन रीसटेबल कॅन्सर असल्याचे निदान झाले. गाठ मोठ्या रक्तवाहिन्यांपर्यंत विशेषतः एसएमव्हीपर्यंत पसरल्यामुळे तातडीने शस्त्रक्रिया करणे जोखमीचे ठरत होते. तज्ज्ञ डॉटरांच्या मल्टिडिसिप्लिनरी टीमने रुग्णाचे वय, अशक्तपणा आणि आजाराची अवस्था लक्षात घेऊन शस्त्रक्रियेऐवजी टप्प्याटप्प्याने उपचार करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला रुग्णाला सहन होईल अशी केमोथेरपी देण्यात आली. त्यानंतर गाठ नियंत्रित करण्यासाठी एसबीआरटी (स्टिरिओटॅटिक बॉडी रेडिओथेरपी) देण्यात आली. त्यामुळे गाठीवर नियंत्रण मिळवता आले आणि रुग्णाच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली. उपचारांनंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून पोटदुखी कमी झाली, भूक वाढली आणि त्या पुन्हा दैनंदिन कामांकडे वळल्या आहेत. अलीकडील पीईटी-सीटी स्कॅनमध्ये कॅन्सर सक्रिय नसल्याचे संकेत मिळाले आहेत. डॉ. प्रज्ञा मोडक, कन्सल्टंट मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली हा यशस्वी उपचार करण्यात आला. या प्रकरणातून वय उपचारांसाठी अडथळा नसून, रुग्णाच्या स्थितीनुसार योग्य उपचार केल्यास गंभीर आजारांवरही सकारात्मक परिणाम मिळू शकतात, हा आशादायी संदेश समोर आला आहे.