शेतकऱ्यांच्या गोठ्यात विज्ञानाची भेट

"टेस्ट ट्युब" तंत्रज्ञानातून उमलली आशा

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
मुंबई
Animal embryo transfer technology पशुपालन क्षेत्रात आधुनिक जैवतंत्रज्ञानाचा प्रभाव वाढत असून भ्रूण प्रत्यारोपण (एंब्रियो ट्रान्सफर) तंत्रज्ञानाने दुग्धउत्पादनात नवे आशादायी चित्र निर्माण केले आहे. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये प्रत्यारोपित भ्रूणांपैकी तब्बल 63 टक्के गायी गरोदर राहण्यात यश आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उच्च प्रतीच्या जातींच्या गायींचे संवर्धन आणि दूधउत्पादन वाढीस मोठी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 

Animal embryo transfer technology India, livestock biotechnology India, dairy farming innovation, IVF in cattle 
या तंत्रज्ञानात उत्कृष्ट आनुवंशिक गुणधर्म असलेल्या दाता गायीपासून स्त्रीबीज (अंडाणू) घेतले जाते. त्याचे प्रयोगशाळेत कृत्रिम फलन करून भ्रूण तयार केला जातो आणि नंतर तो कमी उत्पादनक्षम गायीमध्ये प्रत्यारोपित केला जातो. ही प्रक्रिया मानवातील टेस्ट ट्युब बेबी तंत्रज्ञानासारखीच असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.राज्यातील पशुसंवर्धन आणि कृषी संशोधन क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर वाढत असून देशी गोवंशाचे संवर्धन, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे आणि दूधउत्पादनात वाढ करणे ही प्रमुख उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत. प्रयोगांमधून मिळालेल्या यशामुळे भविष्यात शेतकऱ्यांना उच्च प्रतीच्या गायी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
 
 
या संशोधन प्रकल्पात गीर, साहिवाल Animal embryo transfer technology  आणि थारपारकर यांसारख्या देशी जातींच्या गायींचा समावेश करण्यात आला असून प्रयोगशाळेत तयार केलेल्या भ्रूणांपासून अनेक वासरांचा जन्म यशस्वीपणे झाला आहे. विशेष म्हणजे या तंत्रज्ञानामुळे बदलत्या हवामानात टिकून राहणाऱ्या आणि अधिक उत्पादनक्षम गायींची संख्या वाढवणे शक्य होत आहे.तज्ज्ञांच्या मते, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हे दुग्धव्यवसायासाठी क्रांतिकारी ठरू शकते. त्यामुळे केवळ दूधउत्पादनात वाढच नव्हे तर देशी गोवंशाच्या संवर्धनालाही मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.