देवळी,
burglar-arrested : कोळेगाव चोरे येथील अर्जुना यादव (५०) यांच्याकडे १२ एप्रिल रोजी चोरी झाली होती. या घटनेची देवळी पोलिसात तोंडी तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून चोरट्यास अटक केली.
अर्जुना यादव या बाहेर गावी गेल्या असता चोरट्याने घरी कोणी नसल्याची संधी साधून कपाटातील लॉकरमधून २४ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व रोख ३५ हजार रुपये चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आले.
याप्रकरणी तक्रारदाराच्या तोंडी रिपोर्टवरून पोलिस स्टेशन देवळी येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान एक व्यती अर्जुना यांच्या नवीन घराच्या बांधकामावर काम करीत आहे. त्यानुसार सदर हरिभाऊ गायकवाड (४७) रा. देवळी याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल मंडळकर, हवालदार नितीन तोडसे, पोलिस अमलदार सागर पवार व श्याम गावनेर यांनी केली.