इंधन टंचाईवर इलेक्ट्रिक वाहन पर्याय

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
वेध
नितीन शिरसाट
Electric vehicle भविष्याचा वेगवान प्रवास आजच्या वेगाने जगात वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न हा केवळ सोयीपुरता राहिलेला नाही तर तो पर्यावरण, अर्थव्यवस्था आणि सार्वजनिक आरोग्य यांच्याशी थेट जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या यामुळे वायुप्रदूषण, ध्वनिप्रदूषण, पेट्रोल, डिझेल संकट यांसारख्या समस्या गंभीर होत आहेत. या पृष्ठभूमीवर ई-बस आणि ई-बाईक यांनी केवळ पर्यायी नव्हे तर आवश्यक उपाय स्वतःचे महत्त्व सिद्ध केले आहे. बदलत्या काळाची गरज पारंपरिक पेट्रोल-डिझेल वाहनांवर अवलंबून असलेली वाहतूक व्यवस्था आता पर्यावरणासाठी मोठा धोका ठरत आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम, उष्णतेची वाढ, अनियमित पाऊस आरोग्याच्या समस्या या सर्वांचा मूळ संबंध प्रदूषणाशी आहे. त्यामुळेच शाश्वत विकासाच्या दृष्टीने इलेक्ट्रिकवाहनांकडे वळणे ही काळाची गरज बनली आहे. ई-बस आणि या केवळ नवीन तंत्रज्ञानाचे प्रतीक नसून त्या पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पर्याय आहेत.
 

Electric vehicle 
 
केंद्र व राज्य सरकारांनी आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहनांचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ई-बस या पूर्णपणे इलेक्ट्रिकऊर्जेवर चालतात. त्यामुळे त्यातून कार्बन डायऑसाईड किंवा इतर घातक वायूंचे उत्सर्जन होत नाही. शहरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी ई-बस अत्यंत ठरत आहेत. ई-बस पारंपरिक बसच्या तुलनेत खूपच कमी आवाज करतात. त्यामुळे शहरी भागात शांतता राखण्यास मदत होते. ई- बाईक, कार बसची सुरुवातीची किंमत जास्त असली तरी दीर्घकालीन दृष्टीने त्यांचा खर्च कमी असतो. इंधन खर्च, देखभाल खर्च कमी असल्यामुळे सामान्य नागरिकांना तसेच नगरपालिकांना मोठा आर्थिक फायदा होतो. अक्षय्य तृतीयेच्या मूहूर्तावर ग्राहकांनी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. ऑटोरिक्षाने प्रवास करणार्‍या प्रवाशांना डिझेल व पेट्रोल टंचाई व दरवाढीचा फटका दिवसेंदिवस बसत आहे. एक किलोमीटर अंतरासाठी ऑटोचालक वीस रुपये भाडे घेतात. त्या तुलनेत ई-रिक्षाचे भाडे कमी आहे. त्याचा फटका पेट्रोल, डिझेलवर चालणार्‍या ऑटोरिक्षांना बसला आहे. भारतातील ईव्ही क्रांतीमध्ये दोन आणि तीन चाकी वाटा सर्वाधिक आहे.
 
 
 
केंद्र व राज्य सरकारने पीएम ई-ड्राईव्हसारख्या योजनांमुळे सबसिडी आणि पायाभूत सुविधा Electric vehicle  (चार्जिंग स्टेशन) वाढवण्यावर भर दिला आहे. देशात सार्वजनिक चार्जिंग स्टेशनच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. वाढत्या मागणीसोबतच, बॅटरीची किंमत, चार्जिंग स्टेशनची अपुरी उपलब्धता आणि वाहनांच्या उच्च सुरुवातीच्या किमती ही काही प्रमुख आव्हाने अजूनही ग्राहकांसमोर आहेत. नेटवर्कच्या विस्तारामुळे नवीन मॉडेल्सच्या लाँचमुळे हा कल कायम राहण्याची शक्यता आहे. बुलढाणा एसटी आगारात १७ ई-बसेस प्रवासी सेवेत दररोज धावतात. या बसेस अमरावती, अकोला, जालना, छत्रपती संभाजी नगर जाणे येणे साधारण सहाशे-सातशे किमीपर्यंत प्रवास करतात. या बसेस वातानुकूलित असल्याने प्रवास भाडे दुप्पट आहे. तसेच कोणतीही प्रवास सवलत या बसमध्ये त्यामुळे सर्वसामान्याच्या खिशाला परवडणारी नसल्याने कमी प्रवासी प्रवास करीत असल्याने सध्या तरी तोट्यात बसेसचा प्रवास सुरू आहे. या बसेसचे भाडे लालपरी, शिवशाही बस इतकेच ठेवा अशी मागणी प्रवासी सेवा मंडळाने व प्रवाशांनी केली आहे. असे असले तरी भविष्यात इंधनाची टंचाई बघता ईव्ही वाहनांना लोकांची पसंती आहे. त्याचे अनेक फायदेही इलेक्ट्रिक वाहने ही खूप उत्तम निवड आहे. विशेषत: आपण ज्या वातावरणात राहतो त्यासाठी व सभोवतालच्या लोकांसाठी ती महत्त्वाची आहे. येणार्‍या काळात वाहतूक हे एक मोठे शाश्वत आव्हान आहे. त्यामुळे निर्माते आणि आपल्यासारखे लोक इलेक्ट्रिक फ्लीट वाहनांकडे वळण घेत मोठी भूमिका बजावू शकतात. पेट्रोल किंवा डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत या वाहनांचा खर्च व मेंटेनन्स खर्च खूप कमी असतो. सामान्य कारच्या तुलनेत ईव्हीचा मेंटेनन्स खर्च सुमारे ५० टक्के कमी असतो. इलेक्ट्रिक वाहने आरामदायी व अधिक सहज ड्रायव्हिंगचा अनुभव देतात. बॅटरीचे वजन वाहून नेण्यासाठी सस्पेंशन मजबूत असले पाहिजे. गोंगाट नसल्यामुळे चालवताना आरामदायक वाटते. मुख्य मुद्दा प्रदूषणाचा आहे. जगभरातील शहरे प्रदूषणाशी लढत असताना त्याला अपवाद नाही. सध्या जग हवामानविषयक आव्हानांना सामोरे जात असताना, भविष्यात अशी वेळ येईल की, देशातील काही भाग विशेषत: मोठ्या शहरांमध्ये शून्य उत्सर्जन झोन असतील. रस्त्यावर वाहताना इलेक्ट्रिक कार शून्य उत्सर्जन देतात. Electric vehicle  ईव्ही कोणतेही उत्सर्जन करत नाही. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने पर्यावरणपूरक आहेत आणि पुढील इंधनाचा धोका पाहता लोकांची या पसंती आहे. 
 
९८८१७१७८२८