नागपूर ,
Hanuman Nagar, Nagpur गृहिणी समाज, हनुमान नगर यांच्या वतीने शनिवार, 18 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी चैत्रगौर हळदीकुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.यावेळी प्रसिद्ध नाट्यकर्मी प्राचार्य उज्वला अंधारे यांनी “राजकुमारी प्रियकामा” हा महाराणी कैकयी यांच्या जीवनावर आधारित एकपात्री प्रयोग सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गीतरामायणातील गीतांनी कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
कार्यक्रमात भगिनींनी चैत्रगौरीची आकर्षक सजावट केली होती. उपस्थितांना कैरीची डाळ व पन्ह्याचा आस्वाद देण्यात आला. Hanuman Nagar, Nagpur कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गृहिणी समाजाच्या अध्यक्षा कल्पना पांडे, सचिव नीलिमा टेंभेकर, कोषाध्यक्ष देवयानी देशपांडे तसेच साधना देशमुख, चित्रा किन्हेकर व मेघा जोशी यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य : माधुरी पाडळकर,संपर्क मित्र