हीटवेव्हच्या पार्श्वभूमीवर शाळा ‘मॉर्निंग शिफ्ट ’मध्ये

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
- विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत प्रशासनाचा मोठा निर्णय
 
नागपूर, 
Heatwave: School in the morning शहरात वाढत्या तापमानाने विक्रमी पातळी गाठल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशानुसार नागपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्यात आला आहे. आता सर्व शाळा सकाळी ७:०० ते १०:३० या वेळेतच भरतील.
 

school 
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने जारी केलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे की, सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे मुलांमध्ये उष्माघात आणि इतर आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दुपारच्या तीव्र उन्हापासून दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश पुढील निर्देश येईपर्यंत लागू राहणार आहे.
प्रशासनाने हा निर्णय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंतर्गत घेतला असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधित यंत्रणांना सुधारित वेळांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
Heatwave: School in the morning  दरम्यान, प्रशासनाने पालक आणि शाळांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुलांनी पुरेसे पाणी प्यावे, बाहेरच्या उन्हात जाणे टाळावे आणि उष्माघातापासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
यापूर्वीही २०२४ आणि २०२५ मध्ये तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यावर अशाच प्रकारे शाळांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाही विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने वेळीच पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.