तेहरान,
Iran military warning शत्रूच्या कारवाईला त्वरित आणि निर्णायक प्रत्युत्तर देण्यास सज्ज आहे. होर्मुझ जलमार्गातील अमेरिकेची नाकाबंदी अमान्य असून, त्यांनी जप्त केलेले तोस्का जहाज तत्काळ मुक्त करावे अन्यथा परिणामास सामोरे जावे अशी धमकी इराणी लष्कराच्या खतम अल-अंबिया केंद्रीय मुख्यालयाचे कमांडर अली अब्दुल्लाही यांनी अमेरिकेला दिली आहे.
पाकिस्तानात होणाèया शांतता चर्चेसंदर्भात अनिश्चितता निर्माण झाली असताना इराणच्या भूमिकेने पुन्हा संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कमांडर अली यांनी मंगळवारी सैन्य सज्जतेचे छायाचित्र जारी करीत निवेदनात म्हटले की, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याचा इराणचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. अमेरिका-इस्रायलविरुद्धच्या संघर्षात इराणचे पारडे जड आहे. अण्वस्त्राच्या मुद्यावर Iran military warning आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केलेले दावे निराधार आहेत. होर्मुझमधील अमेरिकेच्या नौदलाची कृती आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीतील एक धोकादायक हस्तक्षेप आहे, ज्यामुळे प्रादेशिक स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो. इराणचे जप्त केलेले जहाज त्यांनी तत्काळ सोडावे अन्यथा परिणाम भोगण्यात तयार राहावे. जहाज, त्यावरील कर्मचाèयांना ताब्यात घेणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.