उद्या केदारनाथ यात्रेचा 'शुभारंभ'

केदारनाथ यात्रेत आता मोबाईलला "नो एन्ट्री"

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
केदारनाथ,
Kedarnath Yatra केदारनाथ धाम येथील पवित्र मंदिराचे दरवाजे २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता भक्तांसाठी खुले होणार असून यंदाची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू होणार आहे. यात्रेपूर्वीच मंदिर प्रशासनाने काही महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. मंदिर परिसरात मोबाईल दूरध्वनी नेण्यास, तसेच छायाचित्रण किंवा ध्वनिमुद्रण करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. मंदिराची पवित्रता अबाधित राखण्यासाठी आणि भाविकांना शांततेत दर्शन घेता यावे यासाठी हा निर्णय घेतल्याचे मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे.
 
Kedarnath Yatra
 
दरम्यान, गंगोत्री धाम येथील मंदिर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर १९ एप्रिल रोजी भक्तांसाठी खुले करण्यात आले असून तेथे मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत आहे. Kedarnath Yatra सकाळपासूनच दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणाने भारून गेला आहे.
 
यंदाच्या केदारनाथ यात्रेसाठी सात लाखांहून अधिक भाविकांनी नोंदणी केल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. अलीकडील बर्फवृष्टीनंतर मार्ग पुन्हा तयार करण्यात आल्याने ही यात्रा काहीशी आव्हानात्मक मानली जात आहे. यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने मार्गावर सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवला आहे. Kedarnath Yatra विविध ठिकाणी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून उंच प्रदेशात आरोग्याशी संबंधित अडचणी उद्भवल्यास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची पथकेही तैनात करण्यात आली आहेत. दरवाजे उघडण्याच्या क्षणाची भक्त आतुरतेने वाट पाहत आहेत.