‘किंग’ची धडाकेबाज एंट्री

प्रदर्शनापूर्वीच 250 कोटींची कमाई

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
मुंबई
King movie बॉलिवूडचा ‘बादशाह’ शाहरुख खान याच्या आगामी ‘किंग’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. तब्बल 400 कोटी रुपयांच्या भव्य बजेटमध्ये तयार होणारा हा चित्रपट 2026 च्या ख्रिसमसला, म्हणजेच 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाने कमाईचा मोठा टप्पा गाठला आहे.
 

King movie 2026 
‘किंग’चा टायटल रिव्हिल व्हिडीओ काही महिन्यांपूर्वी यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आला होता. या व्हिडीओला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत तब्बल 44 मिलियन व्ह्यूज मिळाले. त्यानंतर रिलीज डेट जाहीर करणाऱ्या टीझरलाही 30 मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले, ज्यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
दरम्यान, या चित्रपटाबाबत आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. ‘किंग’चे थिएट्रिकल डिस्ट्रीब्युशन राइट्स तब्बल 250 कोटी रुपयांना विकले गेले असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाने मोठी कमाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. पेन मरुधर या वितरक संस्थेने संपूर्ण भारतातील थिएट्रिकल हक्क विकत घेतले असून, शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटसोबत हा मोठा करार झाला आहे. या वर्षातील हा सर्वात मोठ्या व्यवहारांपैकी एक मानला जात आहे.
‘किंग’ हा चित्रपट King movie शाहरुख खानसाठी विशेष ठरणार आहे, कारण या चित्रपटातून त्याची मुलगी सुहाना खानही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. वडील-मुलीची ही जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.या बहुप्रतीक्षित चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पादुकोण, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, सुहाना खान, अभय वर्मा आणि अर्शद वारसी यांसारख्या दिग्गज कलाकारांची फौज दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट अॅक्शन, ड्रामा आणि भव्यतेचा संगम असणार असल्याची चर्चा आहे.एकूणच, ‘किंग’ हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठ्या आणि बहुचर्चित चित्रपटांपैकी एक ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. प्रेक्षक आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.