सिंधू संस्कृतीचा गौरवशाली वारसा जपण्याची गरज

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
महापौर निता ठाकरे यांचे प्रतिपादन
 
नागपूर,
सिंधी समाजासाठी सिंधी भाषा दिवस महत्त्वाचा असून या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपली संस्कृती, ओळख आणि परस्पर संबंध दृढ होत आहे. विविधतेने समृद्ध असलेल्या सिंधी संस्कृतीचा गौरवशाली वारसा कायम राखणे हे आपले कर्तव्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन Mayor Nita Thackeray महापौर निता ठाकरे यांनी केले.

nita 
 
राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद आणि अखिल भारतीय सिंध मुक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने जरीपटका येथील राजकुमार केवलरामानी ज्युनियर कॉलेजमध्ये सिंधी भाषा दिन आणि सुफी संत भगत कंवर रामजी जयंती निमित्त विशेष कार्यक्रम ते बोलत होते. यावेळी डॉ. वंदना खुशालानी, विजय केवलरामाणी, नगरसेवक विरेंद्र कुकरेजा, महेंद्र धनविजय, नगरसेविका प्रमिला मथराणी, सुषमा चौधरी,संजय चौधरी, नीलम आहुजा, रिचा केवलरामानी, अनिता हेमनानी, प्रीती तिबुडे, डॉ.अभिमन्यू कुकरेजा आदींची उपस्थिती होती.
 
 
Mayor Nita Thackeray  फाळणीच्या वेळी सिंधी समाजाला खूप त्रास सहन करावा लागला, तरीही त्यांनी आपली ओळख, संस्कृती आणि धर्म राखला. सिंधी भाषेचा वापर कमी होत आहे. त्यामुळे, आपण आपल्या मुलांना सिंधी भाषा शिकवणे आवश्यक असल्याचे वीरेंद्र कुकरेजा यांनी सांगितले. सिंध मुक्ती संघटनेचे संस्थापक आणि अखिल भारतीय अध्यक्ष प्रा. विजय केवलारामानी म्हणाले की, आमची भाषा ही आमची आई आहे, म्हणूनच आम्ही तिला मातृभाषा म्हणतो. अटलबिहारी वाजपेयी यांनी भारतीय संविधानात भाषेला मान्यता देण्यासाठी संसदेत एक प्रस्ताव ठेवला होता. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तो मंजूर करून घेतला.भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये सिंधी भाषेला एकमताने मान्यता देण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिताली मेहता, जुही कुंगवानी, रमेश सचदेव, सुनील केवलरामानी, गुलशन दात्रे, लक्ष्मण बलानी, कमल मुलचंदानी, राजू पुडलिक राव, कन्हैयालाल दासवानी हे प्रामुख्याने उपस्थित