अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्यास दाेन महिन्यांचा कारावास

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर :
Molestation of a girl एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. ए. अंसारी यांनी ऋतिक प्रमाेद बाेबडे (24) शिरपूर (ता. उमरेड) यास दाेन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित मुलीचा आराेपी हा ओळखीचा हाेता. मुलीने ऋतिकसाेबत बाेलणे बंद केले हाेते. त्यामुळे ऋतिक संतापला हाेता. 27 डिसेंबर 2021 राेजी त्याने मुलीला गाठले आणि ‘तू माझ्यासाेबत बाेलत का नाहीस.
 
 
karawas
 
Molestation of a girl  तू माझी झाली नाही, तर काेणाचीच हाेऊ देणार नाही’ असे बाेलून शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी उमरेड पाेलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नाेंदवून ऋतिकला अटक केली हाेती. उमरेडच्या सहायक निरीक्षक शितल खाेब्रागडे यांनी याप्रकरणाचा तपास करून आराेपीविरुद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले. न्यायालयात आराेपी ऋतिकवर गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश अंसारी यांनी त्याला दाेन महिन्याची शिक्षा आणि दाेन हजाराचा दंड सुनावला. सरकारर्ते सहायक सरकारी वकील पंकज तपासे यांनी बाजू मांडली.