एमटीडी ढोमणे ज्वेलर्सची ऑफर ठरली प्रेमाची

*७.४५ किलो चांदीचे नाणे मोफत

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
mtd-dhomane-jewelers : गुढीपाडवा ते अक्षय तृतीया म्हणजे १९ मार्च ते १९ एप्रिल दरम्यान एमटीडी ढोमणे ज्वेलर्समध्ये असलेल्या विशेष ऑफर्सना ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. या कालावधीत एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने ग्राहकांसाठी खास योजना राबवली होती. प्रत्येक ७५ हजार रुपयांच्या खरेदीवर ५ ग्रॅम चांदीचे नाणे मोफत देण्यात आले तर जुन्या सोन्यावर १०० टके एसचेंज मूल्य देऊन ग्राहकांना अधिक फायदेशीर खरेदीची संधी उपलब्ध करून देण्यात आली. १ महिन्यात ७.४५ किलो चांदीचे नाणे आग्रहकांना देताना आम्हालाही आनंद झाला असल्याची माहिती एमटीडीचे संचालक सौरभ ढोमणे यांनी दिली.
 
 
K
 
 
 
ढोमणे पुढे म्हणाले की, या उपक्रमांतर्गत ६९० ग्राहकांनी खरेदीचा लाभ घेतला. विशेष म्हणजे, ग्राहकांना भेट म्हणून १ हजार ४९३ चांदीची नाणी वितरित करण्यात आली. या नाण्यांचे एकूण वजन ७ हजार ४५५ ग्रॅम (७.४५ किलो) असून त्याची एकूण किंमत तब्बल १८ लाख ६३ हजार ७५० रुपये इतकी आहे.
 
 
एमटीडी ढोमणे ज्वेलर्स हे नाव गेल्या तीन पिढ्यांपासून विश्वास, पारदर्शकता आणि दर्जेदार दागिन्यांसाठी ओळखले जाते. ग्राहकांच्या बदलत्या गरजा ओळखून नव्या डिझाइन्स, प्रामाणिक व्यवहार आणि आकर्षक योजना यांद्वारे एमटीडीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. वर्धा आणि हिंगणघाट या भागात सुप्रसिद्ध असलेल्या या ज्वेलर्सने ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करण्यावर नेहमीच भर दिला आहे. या यशस्वी ऑफर्समुळे एमटीडी ढोमणे ज्वेलर्सने केवळ विक्रीत वाढ केली नाही तर ग्राहकांना जास्तीत जास्त मूल्य देण्याची आपली वचनबद्धताही पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आगामी काळातही ग्राहकांसाठी अशाच आकर्षक आणि फायदेशीर योजना सादर करण्याचा निर्धार त्यांनी व्यत केला आहे.