तरुणाची हत्या करणाऱ्या दाेन आराेपींना जन्मठेप

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे
 
नागपूर, 
Murder case जुन्या वैमनस्यातून एका तरुणाचा खून केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश शिल्पा बैस यांनी दाेन आराेपींना जन्मठेप सुनावली. राज अनिल पाटील (21) भीमनगर, इसासनी आणि राणू उफर् गंगा महेश्वरी पांडा (19) राॅय टाऊन साेसायटी, आयसी चाैक अशी आराेपींची नावे आहेत.
 
 
janm
 
Murder case  एक वर्षापूर्वी दाेन्ही आराेपींचे कसल्यातरी कारणावरून बादल भाऊराव निंबार्ते (24) याच्याशी वाद झाला हाेता. तेव्हापासून आराेपी हे बादलला मारण्याच्या प्रयत्नात हाेते. 8 जून 2024 राेजी रात्री 10.10 च्या सुमारास बादल हा घरी हाेता. त्यावेळी राजने त्याला फोन करून भीमनगर येथील सावित्रीबाई  फुले अंगनवाडीसमाेर भेटायला बाेलविले. बादल हा घटनास्थळी गेला असता दाेन्ही आराेपी आणि दाेन विधी संघर्षग्रस्त मुलांनी बादलवर चाकू आणि लाेखंडी राॅडने हल्ला करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी एमआयडीसी पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून दाेन्ही आराेपींना अटक केली हाेती. एमआयडीसीचे तत्कालिन उपनिरीक्षक पंकज सयाम यांनी याप्रकरणाचा तपास करून आराेपींविरुद्ध न्यायालयात आराेपपत्र दाखल केले हाेते. न्यायालयात दाेन्ही आराेपींवर खुनाचा गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश बैस यांनी त्यांना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच हजार रुपये दंड सुनावला.