- अतिरिक्त शिक्षक समायोजनालाही तात्पुरती ब्रेक
नागपूर,
Nagpur District Education Action Committee जिल्ह्यातील शिक्षकांवरील वाढत्या प्रशासकीय ताणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्त्वाचे आश्वासन देत दिलासा दिला आहे. बीएलओ (मतदार यादी काम) आणि जनगणना अशी दोन्ही जबाबदाऱ्या एकाच शिक्षकावर टाकण्यात आल्यास, त्यांना केवळ एकच काम देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे शिक्षकांचा ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
मंगळवारी Nagpur District Education Action Committeeनागपूर जिल्हा शिक्षण कृती समितीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी माजी शिक्षक आमदार नागो गाणार, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे सरकार्यवाह रविंद्र फडणवीस यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत शिक्षकांवरील प्रशासकीय कामांचा वाढता ताण, तसेच शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कृती समितीने खासगी अनुदानीत व विनाअनुदानीत शाळांतील शिक्षकांना बीएलओ म्हणून नियुक्ती करू नये, अशी ठाम मागणी केली. तसेच या संदर्भात शिक्षकांवर करण्यात आलेली कारवाई तात्काळ रद्द करण्याचीही विनंती करण्यात आली.
दरम्यान, अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला सध्याच्या परिस्थितीत स्थगिती देण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. शिक्षकांवरील अनावश्यक भार कमी करून शिक्षणाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.