नवे धक्कादायक खुलासे ; विश्व हिंदू परिषदेकडून एसआयटी चाैकशीची मागणी
अनिल कांबळे
नागपूर,
Nagpur shaken: Funds from abroad मानकापूर परिसरातील ‘युनिव्हर्सल मल्टीपर्पज साेसायटी’चा संस्थापक रियाज काजी याने संस्थेतील चार महिला कर्मचाèयांचा विनयभंग करीत धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकला. एका विशिष्ट संघटनेशी जुळलेल्या रियाज काजीला विदेशातून ंड मिळत असल्याचे समाेर आल्याने खळबळ उडाली आहे. चार पीडित तरुणींच्या तक्रारीवरून मानकापूर पाेलिसांनी काजीला अटक केली असून ताे 23 एप्रिलपर्यंत पाेलिस काेठडीत आहे. काजीच्या विराेधातील प्रकरणाने आता माेठे वळण घेतले असून विनयभंग व मानसिक छळाच्या आराेपांबराेबरच त्याच्या आर्थिक नेटवर्कही समाेर आले आहे.
पीडितांनी काजीवर अश्लील वर्तन, मानसिक छळ, धमक्या देणे, बदनामी करणे तसेच धार्मिक बाबींवर दबाव टाकण्याचे गंभीर आराेप केले आहेत. त्याच्या विराेधात आणखी काही पीडित समाेर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणात नव्याने समाेर आलेल्या माहितीनुसार काजीच्या संस्थेला अमेरिका आणि बेंगळुरू येथील संस्थांकडून ‘ग्लाेबल ंड’ मिळत हाेता. या निधीच्या आधारे त्याने 2018 मध्ये ‘पढे हम, पढाएं हम’ हे अभियान सुरू केले हाेते. या माेहिमेतून झाेपडपट्टीतील व शिक्षणापासून दूर गेलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला हाेता. तसेच ओठ विकार असलेल्या सुमारे 175 रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांचा खर्च संस्थेर्माफत उचलण्यात आल्याचा दावा त्याने प्रसारमाध्यमांवर केला.
Nagpur shaken: Funds from abroad काजीने 2010 मध्ये ही संस्था स्थापन केली हाेती. यापूर्वी ताे आराेग्य विभागात कार्यरत असून एचआयव्ही संदर्भातील कामकाज पाहत हाेता. 2016 मध्ये नाेकरी गेल्यानंतर त्याने सामाजिक क्षेत्रात काम सुरू ठेवले. त्याला विविध पुरस्कारांनीही गाैरविण्यात आले हाेते. तेव्हापासून ताे धार्मिक संघटनांमधे काम करण्यास सक्रीय झाला. धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ताे माेठमाेठे कार्यक्रम आयाेजित करीत हाेता, हे विशेष.
एसआयटी स्थापन करण्याची मागणी
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेकडून पाेलिस परिमंडळ 2 चे उपायुक्त नित्यानंद झा यांना निवेदन देत विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे. काजीच्या संपर्कातील इतर व्यक्ती, निधीचे स्राेत व वापर याचीही चाैकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रकरणामुळे नागपूर शहरात माेठी खळबळ उडाली असून पुढील तपासात आणखी धक्कादायक माहिती समाेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दाेन वर्षांपूर्वी तरुणीचा केला हाेता विनयभंग
आराेपी रियाझ काझीने दाेन वर्षांअगाेदर वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या एनजीओतील एका तरुणीचा विनयभंग केला हाेता. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या नावाखाली त्याने तिला जबरदस्तीने आलिंगन देत सलगी करण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यानंतर सातत्याने ताे तिची मानसिक छळवणूक करत हाेता. ताे वारंवार तिच्या जवळ जाण्याचे बहाणे शाेधायचा व तिला एकटीला केबिनमध्ये बाेलवायचा. त्याने नंतर तिच्याशी धार्मिक विषयांवर बाेलण्यास सुरवात केली.
काझीने तयार केली बनावट इंस्टाग्राम आयडी
काझीने एक बनावट इंस्टाग्राम आयडी तयार केला हाेती आणि ताे महिला कर्मचाèयांच्या साेशल मीडियातील हालचालींवर बारीक लक्ष ठेवायचा. त्याने स्वत:चे व एका तरुणीच्या नावाचे इनिशिअल्सचा वापर करून ते खाते तयार केले हाेते. त्या कुठे जातात, काय करतात याची ताे खबरबात ठेवायचा आणि त्यानंतर त्यांना मानसिक त्रास द्यायचा. त्यांना धार्मिक ज्ञान देऊन धर्मांतरण करण्याचा प्रयत्न करीत हाेता, अशी माहिती आहे.