गोंदिया,
Paddy procurement issue तालुक्यातील दासगाव येथे किसान संघर्ष सभेच्या वतीने खरीप हंगाम २०२५-२६ संदर्भात २० एप्रिल रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सभेत धान खरेदीवरील मर्यादा (लिमिट) आणि खरीप हंगामातील प्रलंबित धान चुकार्यावरून शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
सभेत शेतकर्यांनी, धान खरेदी सुरू असताना कोणतीही स्पष्ट सूचना देण्यात आली नाही. मात्र आता गोदामात जागा नसल्याचे कारण पुढे करत चुकारा देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून हा प्रकार अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला.
मुख्यमंत्री विदर्भातील Paddy procurement issue असूनही त्यांना शेतकर्यांचे दुःख समजून घेण्यात अपयश आले आहे. जर धान साठवणुकीची व्यवस्था नव्हती, तर खरेदीपूर्वीच शेतकर्यांना याची माहिती द्यायला हवी होती. आज धान गोदामात जमा झाल्यानंतर आणि पैसे देण्याची वेळ आल्यावर जागा नसल्याचे कारण सांगणे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकर्यांचे म्हणने आहे. दरम्यान, या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या बैठकीतून देण्यात आला. यावेळी सभेला आमदार विनोद अग्रवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक धनंजय तुरकर, बाबा चौधरी, जितेश टेंभरे, शेतकरी नेते गोविंद तुरकर, संचालिका कौशल छत्रपाल तुरकर, जिल्हा परिषद सदस्या नंदा वाढीवा, संचालक पंकज यादव, सरपंच रानु दिनेश तुरकर, होमनदास पटले, दिनेश तुरकर, भाऊलाल रहांगडाले, मंजू डोंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.