शिवराय कुळकर्णी पुन्हा भाजपाचे प्रवक्ता

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
अमरावती, 
shivrai-kulkarni : भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांनी सलग चौथ्यांदा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता या पदावर शिवराय कुळकर्णी यांची नियुक्ती केली आहे.
 
 

K
 
 
 
नियुक्ती बद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ विभागाचे संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, प्रदेशाचे सरचिटणीस आणि अमरावतीचे प्रभारी आमदार संजय कुटे आणि भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यासह भाजपाच्या सर्व वरिष्ठ पदाधिकार्‍यांचे त्यांनी आभार मानले आहे. पक्षाची बाजू योग्य रितीने मांडण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीनच. शिवाय भारतीय जनता पक्षाच्या वाढीसाठी आणि विजयासाठी कार्यरत राहण्यासाठी आम्ही संकल्परत आहोतच. माझ्या आजवर केलेल्या कामगिरीवर शिक्कामोर्तब करून पुन्हा एकदा सलग चौथ्यांदा प्रवक्ता पदावर निवड केल्याबद्दल पक्षाचे मनापासून आभार. भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून मिळत असलेले सहकार्य आणि प्रेम या आधारावरच माझी वाटचाल पुढेच चालू राहणार आहे, अशी भावना शिवराय यांनी व्यक्त केली. अनेकांनी त्यांच्या नियुक्तीचे स्वागत केले आहे.