नामांकन दाखल करण्याचे आवाहन
यवतमाळ,
Special Work Award in Beekeeping महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने 2026 साठी मधुमित्र व मधुसखी पुरस्कारांसाठी इच्छुकांकडून नामांकने मागविण्यात येत आहेत. मधमाशीपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी व यशस्वी मधपाळांचा गौरव करण्यासाठी ही योजना अनेक वर्षांपासून राबविण्यात येत आहे. मधमाशीपालन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मधपाळांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये एका पुरस्काराचा महिला मधपाळांसाठी मधुसखी म्हणून राखीव समावेश आहे. पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे प्रथम 11 हजार रुपये, द्वितीय 7 हजार रुपये व तृतीय 5 हजार अशी आहे.
Special Work Award in Beekeeping 20 मे जागतिक मधमाशी दिनानिमित्त पुणे येथे आयोजित समारंभात पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळासह जिल्ह्यातील खादी मंडळाच्या कार्यालयातही नामांकन अर्ज मिळणार आहेत. इच्छुकांनी आपली नामांकने 4 मे पूर्वी मंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावीत. तसेच अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, किंवा संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर दूरध्वनी 02168-260264 येथे संपर्क करावा, असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी नित्यानंद पाटील व जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.