टेका नाका चाैकात सशस्त्र गुंडांचा हैदाेस

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
- बारा तासांत सहा आराेपींना अटक
- साेशल मीडियावर हल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल

अनिल कांबळे
नागपूर, 
Teka Naka Chauk case कपिलनगरातील टेका नाका चाैकात सिगारेटचे बिल देण्यावरून एका टाेळीने बारसमाेर साथिदारांसह हैदाेस घातला. एका ऑटाेचालकाला बेदम मारहाण करत जीव घेण्याचा प्रयत्न केला. घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या घटनेमुळे नागपूर पाेलिसांचा वचक संपला की काय, प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणी कपीलनगर पाेलिसांनी 12 तासांच सहा आराेपींना अटक केली. माेहम्मद अझहर माेहम्मद अकील शेख (वय 27, रा. कामगार नगर), हुसैन अकरम कुरेशी उफर् अरमान लाेचा (वय 26 कमर काॅलाेनी), प्रिन्स उफर् पिंटू हिरालाल उपाध्याय( वय 27, एन आय टी क्वार्टर), अश्विन उफर् चिंटू दादुराम चाैधरी(वय 23, रा. काशी नगर), इरान रमझान खान( वय 22, कामगार नगर) फरहान उफर् फर्रा गुलाम मुस्ता खान(वय 25, कामगार नगर) अशी अटकेतील आराेपींची नावे आहेत.
 
 

teka naka 
 
Teka Naka Chauk case शेख अकील शेख जलील (वय 45, यशाेधरानगर) हे ऑटाेचालक असून, 20 एप्रिल राेजी मध्यरात्रीच्या सुमारास ते त्यांच्या मित्रांसह टेकानाका येथील हायवे बार अँड रेस्टाॅरंटमध्ये जेवणासाठी गेले हाेते. जेवण आटाेपल्यानंतर ते पार्किंग परिसरात आले असता, तेथे उपस्थित असलेल्या अजहर नावाच्या तरुणाने सिगारेटचे बिल भरण्यास सांगितले. ‘आम्ही तुझे बिल का भरू?’ असे शेखने म्हणताच अजहरने वाद घालण्यास सुरुवात केली. वाद चिघळताच अजहर आणि त्याचा साथीदार हुसेन ऊफर् अरमान लाेचा यांनी िफर्यादी अकीलसाेबत शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अजहरने ाेन करून राजा हिराेती याला घटनास्थळी बाेलावले. काही वेळातच राजा हिराेती हा आणखी 5 ते 6 जणांसह माेटारसायकलवर तेथे आला. त्यांच्या हातात चाकू आणि लाेखंडी राॅड हाेते. आराेपींनी येताच ‘अकील शेख का मर्डर कराे,’ असे म्हणून या हल्ल्यात शेखच्या डाेक्यावर राॅडने प्रहार करण्यात आला तसेच हातावर वार करून बाेट ताेडले. त्यांच्या पाेटावरही वार करण्यात आले. दरम्यान, िफर्यादीला वाचविण्यासाठी आलेल्या त्यांचा मित्र माेहम्मद आसिफ ऊफर् साेनू बसिर शेख (34, भिलगाव) या मित्रावरही आराेपींनी चाकूने हल्ला केला. त्याच्या मानेजवळ व पायावर वार झाल्याने ताेही जखमी झाला. हल्ल्यानंतर आराेपींनी िफर्यादीच्या दुचाकीची ताेडफफाेड केली. जखमी अवस्थेत दाेघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी पाेलिसांत तक्रार दिली. शेखच्या तक्रारीवरून पाेलिसांनी अजहर, हुसेन ऊफर् अरमान लाेचा, राजा दिहाेती, फरान ऊफर् फर्रा, पिंटू, इरान शेख व इतर दाेन साथीदारांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारा तासांत 6 आराेपींना पाेलिसांनी अटक केली.
हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल
टेका नाका चाैकात सशस्त्र गुंडांनी घातलेला हैदाेस आणि ऑटाेचालकावरील हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. हा व्हिडिओ आज शहरभरातील प्रत्येकाच्या माेबाईलवर व्हायरल झाला हाेता. गुन्हेगारांच्या या हैदाेसामुळे पाेलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली.