येण्याचे संकेत ९ महिने आधी आणि जाताचे संकेत नसते

*मोगरा फुललाच्या सुरांतून संत ज्ञानेश्वर उलगडले

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
sant-dnyaneshwar-maharaj : गेल्या दोन दिवसात पारा ४५ अंशावर होता. सोमवारी तो ४२ अंशावर आला. उकाड्याने दिवसभर घामाच्या धारा निघत होत्या. सायंकाळी शासनाच्या वतीने आयोजित मोगरा फुुलला या हळव्या कार्यक्रमात मुता आणि ज्ञानदेव ऐकताना प्रेक्षकांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या... गणेश शिंदे यांनी निरूपनातून समाजभान जागवताना ‘येण्याचे संकेत ९ महिने आधी आणि जाताचे संकेत नसते,’ सांगून बोलया प्राण्याच्या डोळ्यात अंजन घातले.
 
 
L;
 
 
 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मवर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात सायंकाळी ६ वाजता ‘मोगरा फुलला’ या सांस्कृतिक मैफिलीत शिंदे दाम्पत्याने सभागृहावर ताबा घेतला होता.
 
 
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या अद्वितीय विचारसंपदेचा वेध घेताना व्याख्याते व निरुपणकार गणेश शिंदे यांनी भागवतधर्मच उभा केला. येण्याचे संकेत ९ महिने आधी आणि जाताचे संकेत नसते असे सांगताना त्यांनी संपत्ती जमा करण्यावर चिमटा घेत तुकारामने पहिले कर्जमाफी केली असे सांगितले.
 
 
माणसानेच मी स्वत: हुशार जाहीर करून टाकले. पण, त्याच माणसासाठी ९ हजार ओवींची ज्ञानेश्वरी लिहिली गेली. आनंद आमचा नाही दुःखही आमचे नाही असे असतानाही माणसं फत तुलनेत जगतात. त्यापेक्षा आपल्यातलं वेगळे पण जगा. आम्ही धुंदीत जगलो, असे म्हणता आले पाहिजे. येण्याचे संकेत ९ महिने आधी आणि जाताचे संकेत नसते. माणसाला निसर्गाचे संकेत कळतात पण उमजत नाही. पण, एकदा वारी करा. पंढरपुरात एक पाऊल ठेवा. आयुष्यात आपलं सुख दुःख सांगणारा सखा, मित्र देव असावा. जन्मापासुन अनेक संकट झेललेला कृष्ण रडत नाही तर गातो. कुपोषण विरोधात लडणारा कृष्ण होता. दही, दूध लोणी खायला देत होता. त्या काळी ये रे ये रे पावसा अशी कविता होती आता रेन रेन गो अवे... अशी कविता म्हटल्या जात असल्याने त्यांनी आजच्या शिक्षण पद्धतीवरही ताशेरे ओढले.
 
 
समाज जागृती करताना आई वडिलांना जपा. आई गेली की आपलं बालपण संपत. आईचं एक वाय येका. माती आड गेलेली माणसं पुन्हा दिसत नसल्याचे सांगत त्यांनी ज्ञानेश्वरीचे दाखले देत सभागृह स्तब्ध करून टाकले. यासोबतच सुप्रसिद्ध गायिका सन्मिता शिंदे यांनी रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा, अभिर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं, अवघा रंग एक झाला, कानडा राजा पंढरीचा, सावळ्या हरी ऐकुया तरी काय झालं रुसायला गोंधळ, ती गेली तेव्हा पाऊस आणि नाराज होता कवी ग्रीस यांची कविता येते मोगरा फुलला हो भजन, गवळण, भारूड आणि अभंग सादर केले. साजेसे निवेदन प्रसिद्ध निवेदिका पल्लवी पुरोहित यांनी केले.
 
 
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, महेश मोकलकर, मकरंद उमाळकर, आदी उपस्थित होते.
 
वादनाचा अद्भूत नमुना
 
 
मोगरा फुलला हा कार्यक्रम जेवढा दर्जेदार होता तेवढेच वाद्यवृंदनही! वादकांमध्ये एका पायाच्या अंगठ्यात एक टाळ आणि एका हात दुसरा टाळ तर एका हाताने चिपळ्या वाजवल्या जात होता तर मध्येच चिमण्यांचा आवाजही वादक काढत होते.