आपल्याच पोळीवर 'तूप' सर्व काही मलाच हवे

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
मुंबई
Uddhav Thackeray महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. नारी शक्ती वंदन दुरुस्ती विधेयकाच्या आडून देशात फूट पाडण्याचा डाव रचला गेला होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांनी एकत्र येत हा डाव उधळून लावल्याचा दावा करत त्यांनी डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरूनही भारतीय जनता पक्ष (भाजप)ला सडेतोड उत्तर दिले.
 

Uddhav Thackeray 
भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर तीव्र टीका केली. “सर्व काही मलाच हवे” या हव्यासाने पछाडलेल्या काही नेत्यांनी पक्ष सोडल्याचा टोला लगावत त्यांनी पक्षनिष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी दत्ता साळवी यांचे उदाहरण देत जुनी निष्ठा आणि त्यागाची परंपरा आठवली. १९६६ साली शिवसेना स्थापन झाली तेव्हाच्या आठवणी सांगताना त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख केला. दत्ता साळवी यांनी नोकरीचा राजीनामा देऊन हजारो कामगारांच्या जीवनात बदल घडवून आणला, असे सांगत त्यांनी आजच्या राजकारणातील बदलांवर अप्रत्यक्ष टीका केली.
कामगार चळवळीबाबत Uddhav Thackeray  बोलताना ठाकरे म्हणाले की, गेल्या ५८ वर्षांत कामगार सेनेने एकाही कामगाराची फसवणूक केलेली नाही. मात्र आज नव्या संघटना निर्माण करून युनियन फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. “प्रत्येक गेटवर असणाऱ्या भगव्याशी माझं नातं आहे, कुठल्याही मालकाशी नाही,” असे ठाम विधान त्यांनी केले.देशातील कामगार परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी परदेशात काम करणाऱ्या भारतीयांचा मुद्दा उपस्थित केला. दुबईतील कामगारांनी “परत येऊन बेरोजगारीने मरण्यापेक्षा काम करताना मरण बरे” अशी भावना व्यक्त केल्याचा दाखला देत त्यांनी सरकारवर टीका केली. स्वातंत्र्यलढा आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत कामगारांचे योगदानही त्यांनी अधोरेखित केले.
बंगालची वाघीण
दरम्यान, पश्चिम बंगालच्या Uddhav Thackeray  राजकारणावर भाष्य करताना त्यांनी ममता बॅनर्जी यांचे समर्थन केले. “बंगालमध्ये वाघीण एकटीच लढते आहे आणि त्यांनी जिंकलेच पाहिजे,” असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. निवडणुकांदरम्यान मोठ्या प्रमाणावर केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती केल्यावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “ही लोकशाही आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.यावेळी त्यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था, ड्रग्ज प्रकरणे आणि महिलांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांवरूनही सरकारवर निशाणा साधला. कामगारांनी न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरल्यास त्यांना पाकिस्तानशी जोडण्याचे आरोप होत असल्याची टीका करत त्यांनी “कामगारांनी आवाज उठवू नये का?” असा सवाल उपस्थित केला.उद्धव ठाकरे यांच्या या भाषणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.