जिल्हाधिकारी कार्यालयात 'भांडणाचा राडा'

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
bureaucracy scandal जिल्हा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि दबाव तंत्राचे गंभीर आरोप झाल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. टूंडला येथील तहसीलदार राखी शर्मा यांनी जिल्हाधिकारी रमेश रंजन आणि त्यांच्या कार्यालयातील काही अधिकाऱ्यांवर आयफोनसह महागड्या वस्तूंच्या स्वरूपात लाच घेतल्याचा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे.
 

bureaucracy scandal 
राखी शर्मा यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप सार्वजनिक करत थेट मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे हस्तक्षेपाची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका प्रकरणातील चौकशी अहवाल त्यांच्या विरोधात वळवण्यासाठी त्यांच्यावर सतत दबाव टाकण्यात आला. त्यांनी याला नकार दिल्यानंतर प्रशासनाकडून त्यांचा छळ सुरू झाला, तसेच त्यांच्या सेवेत नकारात्मक नोंदी करून वेतनही रोखण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
 
 
या प्रकरणातील सर्वात bureaucracy scandal  गंभीर आरोप असा आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयातील एका अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून सुमारे १.७५ लाख रुपये किमतीचा आयफोन मागवण्यात आला. हा आयफोन नंतर जिल्हाधिकारी वापरत असल्याचा दावा राखी शर्मा यांनी केला असून, या संदर्भातील बिल आणि इतर पुरावे आपल्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.तसेच, या प्रकरणात ऑडिओ क्लिपही समोर आल्याचा दावा केला जात असून, त्यामध्ये मोबाईल खरेदी आणि संबंधित व्यवहाराबाबत चर्चा असल्याचे सांगितले जात आहे. या सर्व घडामोडींनंतर प्रशासनातील अंतर्गत संघर्ष आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांना अधिक बळ मिळाले आहे.दरम्यान, या प्रकरणावर जिल्हाधिकारी रमेश रंजन यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे.
या आरोपांमुळे उत्तर प्रदेशातील प्रशासकीय यंत्रणेतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास आणि शासनाची भूमिका याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.