नागपूर,
Vishwa Kesari Foundation विश्व केसरी फाऊंडेशन तर्फे भगवान श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. श्रीसंत पाचलेगावकर महाराज मुक्तेश्वर आश्रम येथे झालेल्या या सोहळ्याला भाविकांची मोठी उपस्थिती लाभली.
उत्सवानिमित्त आश्रम परिसर आकर्षक रोषणाई व फुलांच्या सजावटीने सजविण्यात आला होता. सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.Vishwa Kesari Foundation लहान बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई व भगवान श्रीराम यांच्या वेशभूषेत सहभाग घेतला होता. ढोल-ताशा व भजनांच्या गजरात वातावरण भक्तिमय झाले.यानंतर गुरुजींच्या हस्ते भगवान श्री परशुराम यांचा अभिषेक करण्यात आला. संस्थेचे सचिव श्रेयस इंदुरकर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली, तर अध्यक्ष समीर खरे यांनी आभार मानले. . शिवानी दाणी वखरे यांची प्रमुख उपस्थिती होती.महाआरती व महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अश्विनी सावदेकर, माधवी वखरे, राधिका बागदेव व विश्व केसरी परिवाराचे योगदान लाभले.
सौजन्य:राधिका बागदेव,संपर्क मित्र