जलवाहिनी फुटल्याने १४ गावातील पाणी पुरवठा प्रभावित

    दिनांक :21-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
water-pipeline-bursts : आर्वी मार्गावरील प्रिया पॅलेसजवळ मुख्य जलवाहिनी फुटल्याने शहरालगतच्या १४ गावांतील पाणी पुरवठा सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
 

K 
 
 
 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पिपरी (मेघे)सह १३ गावांसाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत सुमारे २० हजारांहून अधिक नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. धाम नदीतून उचल केलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून मजिप्रा संबंधित गावांना पाणी पुरवठा करते. पम्पिंग स्टेशनहून पिपरीकडे जाणारी मुख्य जलवाहिनी सोमवार २० रोजी खोदकाम सुरू असताना ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे सर्व १४ गावांमधील पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. नळांना पाणी न आल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यत होत आहे. ऐन उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांना कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर केले असल्याचे मजिप्राच्या अधिकार्‍यांनी सांगितले.