- सालेकसाच्या कारूटोला येथील शेत शिवारातील घटना : परिसरात खळबळ
गोंदिया,
शेतशिवारात एका अनोळखी Youth Dead Body युवकाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याची घटना सालेकसा तालुक्यातील कारूटोला येथे मंगळवारी २१ एप्रिल रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार कारूटोला येथील धरणाच्या कालव्यालगत साखरीटोला येथील रहिवासी भागेश लांजेवार यांच्या शेतात एक युवक मृतावस्थेत पडून असल्याची आढळून आले.
Youth Dead Body याची माहिती शेतमालकाला मिळताच त्यांनी शेत शिवाराकडे धाव घेत तातडीने घटनेची माहिती सालेकसा पोलिसांना दिली. तर ही बातमी गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळावर एकच गर्दी केली. विशेष म्हणजे, मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून तो स्थानिक नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्याचे वय २५ ते ३० वर्षे असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात असले तरी खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच पुढे येणार आहे. दरम्यान, सालेकसा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सदर युवकाचा मृत्यू अपघाती की घातपात अशा चर्चा परिसरात रंगल्या असताना पोलिसांकडून प्रत्येकच बाबींची शक्यता लक्षात घेऊन तपास केला जात आहे. त्यात सर्वप्रथम मृताची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.