विवाहित मैत्रिणीच्या घरासमाेर मध्यरात्री गाेंधळ

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
nagpur-news : मैत्रिणीचे लग्न झाल्यानंतर तिच्या सासरी जाऊन घरासमाेर मध्यरात्री राडा घालत एका तरुणाने तिच्या घराच्या दरवाजाला आग लावली. त्याने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. हुडकेश्वर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
 
 
k
 
ऋषभ (25, वकील पेठ) असे आराेपीचे नाव आहे. त्याची लग्नापूर्वी एका तरुणीची मैत्री हाेती. ताे तिच्यावर एकर्ती प्रेम करीत हाेता. मात्र, वाद झाल्याने तिने त्याच्याशी बाेलणे साेडले हाेते. त्याने त्रास दिल्याने तिने पाेलिसात तक्रार केली हाेती. सहारेविराेधात इमामवाडा व हुडकेश्वर पाेलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल झाला हाेता. त्यानंतर तिचे दीड वर्षापूर्वी लग्न झाले. तिचा पती, मुलीसाेबत चांगला संसार सुरु हाेता. 20 एप्रिल राेजी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास सहारे तिच्या घरासमाेर पाेहाेचला व जाेरजाेरात शिवीगाळ करू लागला. त्याने जाेरजाेरात दरवाजा वाजवला. मात्र, भीतीमुळे महिलेने दरवाजा उघडला नाही. काही वेळाने सहारे तेथे परत पाेहाेचला व शिवीगाळ करू लागला. त्याने दरवाजावर पेट्राेल ओतले आणि आग लावून दिली. त्याने तिला जीवे मारण्याचीदेखील धमकी दिली. महिलेने आरडाओरडा करत शेजाèयांना माहिती दिली. तसेच पाेलिसांना फोन केला. पाेलिस येईपर्यंत सहारे तेथून पळून गेला हाेता. तिच्या तक्रारीवरून सहारेविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.