नागपूर,
Akshaya Tritiya अक्षय तृतीया सणानिमित्त शहरात अनेक ठिकाणी अन्नाची नासाडी होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या दिवशी पितर व पूर्वजांच्या स्मरणार्थ अन्न अर्पण करण्याची परंपरा असून गाईंना अन्न देण्याची प्रथा प्रचलित आहे. मात्र, शहरी भागात गाई सहज उपलब्ध नसल्याने अर्पण केलेले अन्न अनेक ठिकाणी तसेच पडून राहिल्याचे दिसून आले.
ठिकठिकाणी अन्नाने भरलेली पात्रे रस्त्यावर पडलेली असल्याचे दृश्य पाहून नागरिकांनी खंत व्यक्त केली. एकीकडे शेतकरी मोठ्या मेहनतीने अन्न पिकवतो, तर दुसरीकडे अशा प्रकारे अन्नाची अवहेलना होत असल्याने सामाजिक जाणिवेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.याऐवजी अन्न गरजू, भुकेल्या व्यक्तींना देणे,Akshaya Tritiya गरीब किंवा अनाथांना घरी बोलावून जेवण देणे, किंवा अन्नदान संस्थांमार्फत योग्य ठिकाणी पोहोचवणे, असे पर्याय अधिक योग्य असल्याचे नागरिकांनी सुचवले आहे. परंपरेचा मूळ हेतू दान आणि करुणा हा असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार त्याची योग्य अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
सौजन्य:शुभांगी अंधारे,संपर्क मित्र