मुंबई,
Arun Kadam's news ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेले अभिनेते अरुण कदम यांनी आपल्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. आपल्या विनोदी अभिनयामुळे प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अरुण कदम यांच्या आयुष्यात नव्या पाहुणीचे आगमन झाले असून ही बातमी त्यांनी सामाजिक माध्यमांवरून जाहीर केली.
अलीकडेच त्यांनी एक नवी चारचाकी गाडी खरेदी केली असून त्याचाच आनंद त्यांनी एका व्हिडिओद्वारे व्यक्त केला आहे. या खास क्षणी त्यांच्या कुटुंबीयांचीही उपस्थिती होती. गाडी घेतल्यानंतर त्यांनी आपल्या नातवासोबत चालकाच्या आसनावर बसलेला क्षणही त्यांनी चाहत्यांसमोर मांडला आहे. या नव्या खरेदीबद्दल त्यांच्या चाहत्यांनी तसेच मनोरंजन क्षेत्रातील अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्यांच्या या आनंदाच्या क्षणाला सर्वांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.