बिडगाव-भंडारा मार्गाची हाेणार माेजणी

- सार्वजनिक बांधकाम विभागाची उच्च न्यायालयात माहिती

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर, 
bidgaon-bhandara-route : जिल्ह्यातील बिडगाव ते भंडारा दरम्यानच्या रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असून, नागरिकांना माेठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी रूपेश तडस यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणीदरम्यान रस्त्याच्या कडेला अतिक्रमण असल्याचा मुद्दा समाेर आला. त्यानंतर रस्त्याची माेजणी करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अ‍ॅड. संगीता जाचक यांनी न्यायालयाला दिली. न्यायमूर्ती अनिल किलाेर आणि राज वाकाेडे यांच्या खंडपीठाने दाेन आठवड्यांचा अवधी देत माेजणीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
 

DA  
 
 
मार्च 2023 च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या कामासाठी 400 काेटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला हाेता. यात नरसाळा ते गारगाेटी, दिघाेरी नाका ते खरबी (राऊतनगर मार्ग), जिजामातानगर ते तराेडी (खुर्द) आणि बिडगाव एनएच-6 ते नवीन नगर या विविध मार्गांचा समावेश आहे. मात्र, केवळ 150 मीटरचा जाेड रस्ता अपूर्ण राहिल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण हाेत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर निधीनुसार हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. सुनावणीदरम्यान अतिक्रमणाबाबत अर्ज प्राप्त झाल्याचे अ‍ॅड. जाचक यांनी सांगितले. माेजणीनंतर अडथळा ठरणाèया इमारती अवैध असल्यास त्यावर कारवाई करण्यात येईल, तर अधिकृत इमारती असल्यास त्यांना प्रतिवादी करण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने यास अनुमती दिली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. स्वप्निल शिंगणे यांनी बाजू मांडली.
 
 
जमीन संपादनाचा अडथळा
 
 
याचिकाकर्त्यांनी 4 एप्रिल 2025 राेजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंत्यांना कायदेशीर नाेटीस पाठवून काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली हाेती. त्यावर 4 जून 2025 राेजी प्रशासनाने उत्तर देताना संबंधित प्रकल्पासाठी अद्याप जमीन संपादन पूर्ण झाले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठाेठावला.