दारव्हा येथे अखिल भारतीय आमदार चषक फुटबॉल स्पर्धा

चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसचे आयोजन

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
football-tournament : येथील क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तथा युवा मार्गदर्शन या क्षेत्रात सतत कार्यात अग्रेसर असणाèया चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसतर्फे आमदार तथा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या सहकार्याने अखिल भारतीय आमदार चषक फुटबॉल स्पर्धा होत आहे.
 
 
kl;
 
गेली 9 वर्षांपासून दारव्हा येथे अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या नाही. 2019 ची निवडणूक, नंतर कोरोना, नंतर मैदानालगत असलेल्या नगर परिषद बचत भवन सभागृह व बॅडमिंटन हॉलमध्ये यामुळे मागील 9 वर्षे कोणत्याही प्रकारचे सामने होऊ शकलेले नाही.
 
 
सध्या तात्पुरते मैदानाचे काम केले असता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 30 एप्रिल ते 3 मे दरम्यान छत्रपती श्री शिवाजी महाराज फुटबॉल स्टेडियम येथे खेळवल्या जाणार आहेत. या सामन्यात स्पर्धक म्हणून दारव्हा, यवतमाळ, पुसद, वर्धा, नागपूर, अमरावती, गडहिंग्लज, कोल्हापूर, सांगली, जालना, मुंबई, पुणे, निमच (मध्यप्रदेश), कोरबा छत्तीसगड, आसाम यासह इतर काही संघ सहभागी होत आहेत.
 
 
या स्पर्धसाठी पहिले बक्षीस 71000 रुपये, द्वितीय क्रमांक 41000, तिसरे बक्षीस 21000 रुपये तथा चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्टसतर्फे उत्कृष्ट ट्रॉफी देण्यात येईल. वैयक्तिक बक्षिसे व रोख राशीसुद्धा प्रदान करण्यात येतील, अशी माहिती फुटबॉल मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष गणेश भोयर यांनी दिली.
 
 
सामन्यांसाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. गोपाल अग्रवाल, अनिल लाभसेटवार, ओंकार निमकर, डॉ. सुभाष खाटिक, सूरज तुमसरे, लक्ष्मण नवरंगे, वहीदखान, अशपाक अली, प्रवीण भोयर, मिलिंद पांडे, रमेश गुळदे, गोपाल भोयर, दिलीप फेंडर, सूत्रसेन भितकर, गफूर, विजय काळे, राजू केदार, आनंद झोल, विनोद भोयर, रोहन शिंगनजुळे, महेश भोयर, डॉ. राम अगरवाल, ओम फेंडर, राजू चौधरी, सोजल गुल्हाने, नितीन ढोरे, साहिल मिराशे, पूर्वेस लांजेवार, समर्थ सार्थक, बाजील खान, अल्कामन खान, निमकर यांनी दिली.