पारवा,
death-of-a-promising-young-man : घाटंजी तालुक्यातील वघारा टाकळी येथील सतीश मॅकलवार (वय 32) यांचा ट्रॅक्टर अपघातात मंगळवार, 21 एप्रिल रोजी मृत्यु झाला. या होतकरू व सुस्वभावी युवकाच्या मृत्युने वघारा, टाकळीसह परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. सतीष हा गावातच नव्हे तर संपूर्ण कुर्ली, पारवा परिसरात अत्यत मनमिळावू स्वभावच्या सतीशच्या अचानक जाण्याने मित्र परीवारासह परिसरात सर्वत्र शोककळा पसरली. सतीशच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, भाऊ आणि मोठा परीवार आहे.