आर्णी,
dhanashree-vyavhare : सीबीएसई दहावीच्या निकालात आर्णीच्या धनश्री संजय व्यवहारे हिने 95 टक्के गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिग्रस येथील गुरुकुल इंग्लिश शाळेची विद्यार्थिनी असलेल्या धनश्रीने शाळेच्या गुणवत्ता यादीत ‘टॉप फाईव्ह’मध्ये स्थान मिळवले. आर्णी नगर परिषदेचे शिक्षण सभापती संजय व्यवहारे यांची कन्या असलेल्या धनश्रीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश मिळविले. सातत्यपूर्ण अभ्यास, शिस्तबद्ध नियोजन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे तिने हा टप्पा गाठला. आपल्या यशाचे श्रेय धनश्रीने मुख्याध्यापक, शिक्षक, आई-वडील तसेच सहाध्यायी मित्रमैत्रिणींना दिले. या यशाबद्दल तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.