अभय इंगळे
दिग्रस,
digras-layout-issue : प्लॉट घेतला आहे तर बांधता येत नाही, बांधला आहे तर विकता येत नाही, विकला आहे तर खरेदी होत नाही, दिग्रसमध्ये प्लॉट घेऊन, आमचं कुठं चुकलं, अशा कवितेतून एका प्लॉट घेणाèयाने आपली व्यथा मांडली असून प्लॉट खरेदी विक्री चालू करण्याची मागणी होत आहे.
गेल्या 14 महिन्यांपासून प्लॉट घेऊन अडकलेल्या लोकांची व्यथा व प्रकरणातील सत्यता ‘तरुण भारत’ने अगदी स्पष्ट सर्वांसमोर आणून भ्रष्ट अधिकाèयांचे नको ते उद्योग लोकांच्या निदर्शनास आणून दिले. येथील लेआऊट प्रकरण शहरात आज लपून राहिलेले नाही.
लाखो रुपये खर्च करून प्लॉट घेणारे पश्चाताप करत बसले आहेत, ही वस्तुस्थिती आता लोकांसमोर आली आहे. लेआऊट अनाधिकृत ठरवणाèया दिग्रस नगर परिषदेने आपली घोडचूक (की अर्थपूर्ण व्यवहार..?) लोकांच्या माथी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. ही घोडचूक करणारे काही तात्पुरते निलंबित केले गेले, आणि पुन्हा कामावरही घेतले गेले.
कारण या लेआऊटमध्ये रस्ते, ओपन स्पेस आहेत की नाही, सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या की नाही याची शहानिशा करणे हे त्या लेआऊटला मान्यता देण्यापूर्वी तपासणे गरजेचे होते आणि नेमके तसे झालेच नाही.
या प्रकरणावर एका पीडिताने केलेली कविता दिग्रसमध्ये खूपच चर्चेचा विषय झाली असून या कवितेतील काही ओळी आहेत, एसआयटी लावली म्हणते, रिझल्ट नाही भेटला, दिग्रसमध्ये प्लॉट घेऊन, आमचं कुठं चुकलं, घेतला प्लॉट आहे, तर बांधता येत नाही, बांधला आहे तर विकता येत नाही, विकला आहे तर खरेदी होत नाही, दिग्रसमध्ये प्लॉट घेऊन, आमचं कुठं चुकलं..?