पशुपक्ष्यांसाठी नागरिकांना जलपात्रांचे वाटप

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अनिल कांबळे,
नागपूर,
distribution-of-water-containers : उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून या कडक उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या निर्माण हाेते. या पार्श्वभूमीवर शहरातील संजय टाेपरे यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने जलपात्र वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून काैतुक केले जात आहे.
 
 
jkl
 
 
 
टाेपरे हे नागरिकांना तसेच सार्वजनिक ठिकाणी सिमेंटचे जलपात्र वितरित करत आहेत. आतापर्यंत त्यांनी 40 जलपात्रांचे वाटप पूर्ण केले असून लवकरच आणखी 60 जलपात्रांचे वितरण करण्याचे त्यांनी नियाेजन केले आहे. या जलपात्रांमुळे उष्णतेच्या लाटेत त्रस्त झालेल्या पक्षी व प्राण्यांना पाण्याचा दिलासा मिळणार आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमाेर, बाल्कनीत किंवा सार्वजनिक ठिकाणी पाण्याचे पात्र ठेवावे, नियमितपणे त्यात स्वच्छ पाणी भरावे आणि पशुपक्ष्यांच्या जीवितासाठी हातभार लावावा, असे आवाहन टाेपरे नागरिक करीत आहेत. त्यांच्या या कार्याला गाैरव मान आणि विशाल हेडाऊ सहकार्य करीत आहेत.