नागपूर
Dr. Praveen Dubli विद्योत्तमा फाउंडेशन, नाशिकच्या नागपूर शाखेतर्फे मोर भवन येथील उत्कर्ष सभागृहात वरिष्ठ साहित्यिकांच्या सन्मान समारंभासह कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष सुबोध मिश्र होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सागर खादीवाला व सहस्त्रबुद्धे, तर विशेष अतिथी म्हणून डॉ. मधुलता व्यास, पूनम मिश्रा, डॉ. स्वर्णिमा सिन्हा आणि हेमलता मिश्रा उपस्थित होत्या.

यावेळी शहरातील वरिष्ठ साहित्यिकांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर स्वतंत्र वरिष्ठ पत्रकार, जल कार्यकर्ता व ‘जल योद्धा’ पुरस्कारप्राप्त डॉ. प्रवीण डबली यांचा सामाजिक पत्रकारिता व जलसंवर्धन क्षेत्रातील कार्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. ऐतिहासिक विहिरींचे संवर्धन व भूजल पातळी वाढविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल यावेळी घेण्यात आली.Dr. Praveen Dubli सत्कारानंतर बोलताना डॉ. डबली यांनी जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांना आपल्या परिसरातील विहिरींचे जतन व पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. साहित्यिकांनीही आपल्या लेखनातून जलसंवर्धनाबाबत जनजागृती करावी, असे त्यांनी नमूद केले.
सौजन्य:सुहास खरे,संपर्क मित्र