आठवा वेतन आयोग: कर्मचाऱ्यांना मिळणार लाखोंचा एरियर?

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Employees will get arrears सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची घडामोड समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर वेतनवाढीसोबतच थकबाकी रकमेचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आयोगाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होईल याबाबत अद्याप स्पष्टता नसली, तरी त्याची गणना १ जानेवारी २०२६ पासून लागू मानली जाणार असल्याने कर्मचाऱ्यांना मागील कालावधीची थकबाकी मिळू शकते. कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मुख्य आधार असणाऱ्या फिटमेंट घटकाबाबतही चर्चा रंगली आहे. कर्मचाऱ्यांकडून हा घटक सुमारे ३.८३ ठेवण्याची मागणी करण्यात आली असून, ती मान्य झाल्यास किमान वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या १८ हजार रुपये असलेले मूळ वेतन तब्बल ६९ हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.
 
Employees
 
 
जर हा निर्णय मंजूर झाला आणि आयोगाची अंमलबजावणी उशिरा झाली, तर त्या कालावधीतील थकबाकी रक्कमही कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. उदाहरणार्थ, सप्टेंबर २०२७ मध्ये अंमलबजावणी झाली, तर जवळपास २० महिन्यांचा फरक जमा होऊन कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम मिळू शकते. विविध स्तरांवरील कर्मचाऱ्यांसाठी ही थकबाकी रक्कम लाखोंमध्ये जाण्याची शक्यता असून, काही प्रकरणांमध्ये ती १० ते १६ लाख रुपयांपर्यंत पोहोचू शकते. तथापि, या सर्व अंदाजांवर अंतिम निर्णय सरकारकडून होणाऱ्या मान्यतेवर अवलंबून आहे. फिटमेंट घटक किती ठरतो आणि आयोगाची अंमलबजावणी नेमकी कधी होते, यावरच कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या लाभाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.