गोंदिया,
gondia-news : स्थानिक गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था मर्यादित, गोंदिया (र. नं. ०१) यांच्या वतीने सेवानिवृत्त सभासद शिक्षकांचा सत्कार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सडक अर्जुनी येथील आशीर्वाद लॉन येथे आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्ष लायकऱाम भेंडारकर होते. यावेळी जि.प. उपाध्यक्ष सुरेश हर्षे, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, आयएएस डॉ. पंकज पटले, पं. स. सभापती चेतन वडगाये, जि. प. सदस्य भुमेश्वर पटले, चंद्रकला डोंगरवार, उपसभापती निशा काशीवार, पं. स. सदस्य शिवाजी गहाणे, अल्लाउद्दीन राजानी, डॉ. रुकीराम वाढई, सपना नाईक, वर्षा शहारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतपर गीताने झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेच्या कार्याचा आढावा घेताना, शिक्षकांनी केलेल्या सेवाभावाचे कौतुक व संस्थेच्या वाढीकरिता सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. दरम्यान, सेवानिवृत्त शिक्षकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. आपल्या मनोगतात डॉ. पंकज पटले यांनी शिक्षक हा समाजाचा कणा असून त्यांच्यामुळेच देशाची भावी पिढी घडते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षक सभासद सपत्नीक व गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन संदीप तिडके व उमेश रहांगडाले यांनी केले. शेवटी संस्थेच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष किशोर डोंगरवार, उपाध्यक्ष अशोक बिसेन, शाखाध्यक्ष गौतम बांते, विनोद बडोले, शोभेलाल ठाकूर, दिलीप लोदी, राजेंद्र बोपचे, सतीश दमाहे, भारती तिडके, नीतू दहाट, व्यवस्थापक ज्योतिप्रकाश गजभिये यासह सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.