तभा वृत्तसेवा
दारव्हा,
employees-strike : यवतमाळ जिल्हा सरकारी, निमसरकारी, शिक्षक, कर्मचारी समन्वय समितीच्या आवाहनानुसार दारव्हा तालुक्यातील हे सारे मंगळवार, 21 एप्रिलपासून बेमुदत संपावर गेले आहेत.
त्यांच्या मागण्यांमध्ये, सुधारित राष्ट्रीय निवृत्ती योजनेची अंमलबजावणी करा, वाहनचालक व चतुर्थश्रेणी भरतीवरील बंदी हटवा, कंत्राटी कर्मचाèयांच्या सेवा नियमित करा, चतुर्थ श्रेणी कर्मचाèयांच्या मुलांना सेवनिवृत्तीनंतर नोकरी द्या, सर्व संर्वगातील रिक्त पदे त्वरित भरा, सेवानिवृत्ती वय 60 करा, यांचा समावेश आहे.
जिल्हा व तालुका पदाधिकारी अशोक निमकर, नवनीत शहाकार, महेश साखरकर, मनोहर देशमुख, प्रल्हाद निंबर्ते, भालेराव भगत, माधुरी मांडन, उज्ज्वला वानखडे, अतुल सिंगारे, अविनाश मडावी, रवींद्र मुंडे, सचिन शेळके, रवी लोंढे, किशोर गोरडे, निलेश पिंपळकर, सुमित्रा शेळके, गंगा देवतळे संपकèयांचे नेतृत्व करीत आहेत.