जि.प. अध्यक्षांच्या हस्ते ५२ लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
अर्जुनी मोरगाव,
development-works : जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांच्या निधीतून व पुढाकारातून चान्ना व पिंपळगाव/खांबी परिसरातील विविध विकासकामांसाठी ५२ लाख रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली असून या विकासकामांचे भूमीपूजन भेंडारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
 

k  
 
 
मंजूर विकास कामांमध्ये पिंपळगाव/खांबी येथे १२ लाख रुपयांची अंगणवाडी इमारत, १० लाख रुपयांचा सिमेंट रस्ता तसेच दलित वस्ती अंतर्गत ५ लाख रुपयांचा सिमेंट रस्ता अशा एकूण २७ लाख रुपयांच्या कामांना प्रारंभ झाला. तसेच चान्ना/बाक्टी परिसरात सिमेंट रस्ते बांधकाम, प्राथमिक आरोग्य उपकेंद्राकडे जाणारा पोच मार्ग, तसेच दलित वस्तीतील सिमेंट रस्ते अशा विविध कामांचे २५ लाख रुपयांचे भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पूजाविधीने करण्यात आली. या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होणार असून, विशेषतः वाहतूक व्यवस्था व दैनंदिन जीवन अधिक सुलभ होणार आहे. यावेळी बोलताना जि.प. अध्यक्ष भेंडारकर यांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. गावोगावी रस्ते, अंगणवाडी व आरोग्य सुविधा सक्षम झाल्या तरच खरा विकास साध्य होईल, असे ते म्हणाले.
 
 
विशेषतः दलित वस्तीतील रस्त्यांच्या कामांमुळे तेथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी पं. स. उपसभापती संदीप कापगते, पं. स. सदस्य कुंदा लोगडे, पिंपळगाव सरपंच विलास फुंडे, उपसरपंच निवृत्ता शेंडे, चान्ना सरपंच सचिन डोंगरे, उपसरपंच मोरेश्वर सोनवाणे, वि.से. सहकारी संस्थेचे अध्यक्ष अरुण गजापुरे, भागवत लंजे, विनायक राखडे, मरसकोल्हे, ग्रामविकास अधिकारी सचिन कुथे, आर. ए. मेश्राम, मनोज कोरे, पोलिस पाटील वसुंधरा चौरे, माधुरी ब्राह्मणकर, मोक्षलता ब्राह्मणकर, आम्रपाली चौरे, निग्रोकांता डोंगरे, धम्मक्रांती तुरकर, पिंगला फुंडे, अनमोल शेंडे, भूमेश्वरी मेंढे, रीना ब्राह्मणकर तसेच गावातील इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.