अनिल कांबळे
नागपूर,
murdered-in-jaripatka : एका हाॅटेल चालकाचा अज्ञात आराेपींनी गळा चिरुन खून केला. त्याचा मृतदेह पाेत्यात बांधून चक्क जरीपटका पाेलिस ठाण्याच्या काही अंतरावर नारा घाटजवळ पिली नदीवरील पुलाखाली ेकण्यात आला हाेता. राहुल सुनील साहू (वय 38) अशी मृताची ओळख झाली असून ताे झिंगाबाई टाकळी येथील रहिवासी हाेता. ताे सदर छावणी परिसरात भाड्याने ओयाे हाॅटेल चालवत हाेता.
राहुल साहू हा एका व्यक्तीकडून पैसे घेण्यासाठी बाहेर जात असल्याचे आपल्या हाॅटेलमधील एका कर्मचाèयाला सांगून बाहेर पडला हाेता. मात्र, रात्री उशिरापर्यंत ताे घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या पत्नीने सदर पाेलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली हाेती. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राहुल साहू हा हॅप्पी डे नावाने हाॅटेल चालवत हाेता. 20 एप्रिल राेजी सायंकाळी 7.30 वाजता ताे आपल्या माेपेडवरून पैसे घेऊन येताे असे एका कर्मचाèयाला सांगून बाहेर पडला हाेता. मात्र, ताे परतलाच नाही. त्याचा माेबाईल बंद येत असल्याने कुटुंबीयांनी शाेध घेतला आणि अखेर सदर पाेलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार नाेंदवली.
पाेत्यात सापडला मृतदेह
बुधवारी दुपारी काही नागरिकांना नारा घाट पुलाखाली पाेत्यात मृतदेह दिसल्याने त्यांनी पाेलिसांना माहिती दिली. जरीपटका पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. ठाणेदार अनिल ताकसांडे यांनी सांगितले की, मृताच्या गळ्यावर आणि डाेक्यावर जखमा आढळल्या असून प्राथमिक तपासात हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय आहे. अज्ञात आराेपींनी राहुलचा खून दुसरीकडे करून मृतदेह येथे आणून ेकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
परीसरात भीतीचे वातावरण
राहुलचा खून झाल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाेलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. चक्का जरीपटक्का पाेलिस ठाण्याच्या काही अंतरावर आराेपींनी मृतदेह ेकल्यामुळे गुन्हेगारांची हिम्मत दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. राहुलला पत्नी आणि दाेन मुले आहेत. विशेष म्हणजे पाेलीस ठाण्याजवळच असा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त हाेत आहे.सध्या पाेलिसांकडून या प्रकरणाचा सखाेल तपास सुरू असून आराेपींचा शाेध घेतला जात आहे.