चांदूर रेल्वे,
house-burglary-suspect-arrested : तालुक्यातील बागापुर येथे एका बांधकाम ठेकेदाराच्या घरी घरफोडी करून सुमारे ७ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ८ एप्रिल रोजी घडली होती. या चोरीचा छडा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे.

२१ एप्रिल रोजी या चोरीतील आरोपी सागर रतन पवार (वय ४५ वर्ष, रा.शिवाजी नगर, चांदूर रेल्वे), रोहन चंदन पवार (वय १९ वर्ष, रा. तरोडा) यांना अटक करण्यात आली आहे. ऋषी चंदन पवार (वय २० वर्ष रा. तरोडा), रुतेश मनीचरण भोसले (रा. तरोडा) व दुर्नेसिंग पवार (रा. तरोडा) असे ३ आरोपी फरारीत आहे. माहितीनुसार, ९ एप्रिल अशोक पवार रा. बागापुर यांनी चोरी झाल्याची तक्रार दिली होती. त्यावरून तपास सुरू झाला. पोलिसांन गोपनिय माहितीवरून सागर पवार व रोहन पवार यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यावर त्यांनी फरारीत असलेल्या तिघांची नावे सांगून गुन्हा केल्याची कबुली दिली. चोरीतून मिळालेल्या पैश्यातून स्वराज कंपनीचा एक नवीन ट्रॅक्टर विकत घेतला व ईतर पैसे समान भागात वाटुन घेउन गुन्ह्यातील चोरलेले दागिने फरार आरोपी यांचे जवळ असल्याचे सांगीतले. मुद्देमाल जप्त व फरार असल्याचा शोध सुरू आहे.
या आरोपींनी ग्राम शिवनी रसुलापुर (नांदगाव खंडेश्वर) येथे सुध्दा घरफोडी केल्याची कबुली दिली. ही कारवाई सहा. पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलिस अंमलदार गजेंद्र ठाकरे, युवराज मानमोठे, रवींद्र वर्हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, सायबर विभागाचे विकास अंजिकर, चालक प्रज्वल राउत यांनी केली.