‘नमो विद्या उद्यान’ निविदा प्रक्रियेत ‘अर्थ’पूर्ण अडथळे..?

महागाव नगर पंचायत कारभारावर संशयाची सुई

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
महागाव, 
namo-vidya-udyan-tender-process : शहराच्या सौंदर्यात भर घालणाèया आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाèया प्रभाग 2 मधील ‘नमो विद्या उद्यान’ या विकासकामाच्या निविदा प्रक्रियेवरून सध्या महागावमध्ये मोठे वादळ निर्माण झाले आहे. नगर पंचायत प्रशासनाने ही प्रक्रिया राबवताना पारदर्शकतेच्या तत्त्वांना हरताळ फासल्याचा गंभीर आरोप होत असून, ठराविक ठेकेदारांचे ‘हित’ जोपासण्यासाठी अटी-शर्तींची मोडतोड केल्याची चर्चा शहरात रंगली आहे.
 

y22Apr-Nitin-Narwade 
 
 
 
या उद्यानाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या निविदेत अशा काही अव्यवहार्य आणि जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत, ज्यामुळे अनेक पात्र व अनुभवी ठेकेदार स्पर्धेतून आपोआप बाहेर फेकले गेले आहेत. मुख्याधिकारी व संबंधित अभियंत्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून ही निविदा केवळ ‘निवडक’ कंत्राटदारांसाठीच खुली ठेवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 
 
विशेष म्हणजे, जिओ टॅगिंग आणि तत्सम तांत्रिक बाबींसाठी शासनाने कमी दराचे आराखडे व स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिली असताना महागाव नगर पंचायतने या शासन निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने स्वतःचे ‘नियम’ लादून स्पर्धात्मक वातावरण बाधित केल्याने यामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.
 
 
शासनाचे नियम धाब्यावर बसवून निविदेत सोयीस्कर बदल करून जाणीवपूर्वक अटी कडक केल्याने बहुसंख्य ठेकेदारांना या प्रक्रियेत सहभागी ठराविक कंत्राटदारांना लाभ मिळवून देण्यासाठी अधिकाèयांची संशयास्पद भूमिका असल्याची चर्चा आहे.
 
 
या प्रकरणातील गोंधळ समोर येताच, सामाजिक कार्यकर्ते नितीन नरवाडे यांनी 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकाèयांकडे दाद मागितली आहे. संबंधित अभियंता आणि मुख्याधिकारी यांच्या भूमिकेची उच्चस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
 
आता या प्रकरणावर जिल्हा प्रशासन काय पाऊल उचलते आणि ‘नमो विद्या उद्याना’चा मार्ग मोकळा होतो की हे काम भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकते, याकडे संपूर्ण महागावकरांचे लक्ष लागले आहे.
मनमानी खपवून घेणार नाही
 
 
‘नमो विद्या उद्यान’ हा प्रकल्प शहरासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, प्रशासनातील अधिकारी आपल्या मर्जीतील लोकांना कामे देण्यासाठी नियमांची पायमल्ली करत आहेत. शासन निर्णयाचे उल्लंघन करून सुरू असलेली ही मनमानी खपवून घेतली जाणार नाही.
नितीन नरवाडे
सामाजिक कार्यकर्ता