धोनी फिट, जॅक्स संघात!

मुंबई-चेन्नई सामन्याची रंगत वाढली

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Mumbai-Chennai match मुंबईतील वानखेडे मैदानावर होणाऱ्या स्पर्धेतील पुढील सामन्याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील या लढतीत अनुभवी खेळाडू एम.एस. धोनी मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सराव सत्रादरम्यान तो चांगल्या लयीत दिसल्याने त्याच्या खेळण्याबाबत सकारात्मक संकेत मिळाले आहेत. हंगामाच्या सुरुवातीला पायाच्या स्नायूच्या त्रासामुळे त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होते, मात्र अलीकडील सरावात त्याने यष्टीरक्षणासोबत फलंदाजीतही आत्मविश्वासपूर्ण कामगिरी दाखवली. तो संघात परतल्यास चेन्नईच्या फलंदाजीला मोठी ताकद मिळू शकते. सध्या गुणफलकावर मागे असलेल्या संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

dhoni played mi 
 
दरम्यान, मुंबईच्या संघात इंग्लंडचा खेळाडू जॅक्स सहभागी झाला आहे. वैयक्तिक कारणांमुळे तो आतापर्यंतच्या सामन्यांपासून दूर होता, मात्र आता तो सरावात सक्रिय दिसत आहे. त्याच्या येण्याने संघाच्या मधल्या फळीत बळकटी येण्याची अपेक्षा आहे, तसेच फिरकी गोलंदाजीतही पर्याय वाढणार आहेत.मुंबईने मागील सामन्यात दमदार विजय मिळवल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. तर दुसरीकडे चेन्नईसाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा बनला आहे. काही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेल्याने त्यांच्यावर अतिरिक्त दबाव आहे, मात्र नव्या खेळाडूंच्या समावेशामुळे त्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. एकूणच, या सामन्यात दोन्ही संघांसाठी बरीच काही दावावर लागलेली आहे. एका बाजूला मुंबईचा वाढलेला आत्मविश्वास, तर दुसऱ्या बाजूला चेन्नईची विजयाची गरज आणि धोनीच्या संभाव्य पुनरागमनामुळे हा सामना अधिकच रंगतदार होण्याची शक्यता आहे.