पोटच्या गोळ्याने केला खुन; आजन्म कारावास

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
murder-case : आईचा खून करणार्‍या मुलगा मोहन उर्फ सोपान वल्दे मुरलीधर पुसदकर याला आजन्म कारावासाची शिक्षा आणि दंड ठोठावला. हा निर्वाळा येथील जिल्हा न्यायाधीश-२ एस. जे. अंसारी यांनी दिला.
 
 
jk
 
 
आरोपी सोपान याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे त्याची आई त्याला अनैतिक संबंध तोडून टाकण्यास सांगत होती. त्या रागातून मुलाने २ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री आई मीरा झोपून असताना दगडी पाट्याने तिच्या चेहर्‍यावर मारून तिला जागीच ठार केले. त्यानंतर घरी भाड्याने राहणारा प्रेमदास आत्राम याने दरवाजा ठोकून योगिता चौधरी हिला उठविले व सोपान याचे घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर योगिता हिने जाउन पाहिले असता मीराबाई पुसदकर ही रताच्या थारोळ्यात मृतावस्थेत दिसली. मुलगा तिच्याजवळच बसून होता. तक्रारीवरून खरांगणा पोलिसांनी गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक सदाशिव ढाकणे यांनी केला. मुलाने गुन्हा केल्याचा सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.
 
 
सरकारतर्फे अतिरीक्त सरकारी वकील विनय आर. घुडे यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात शासनातर्फे ९ साक्षीदार तपासले. सर्व साक्षदारांची साक्ष अहवाल ग्राह्य धरुन मुलाला शिक्षा सुनावली.