आता जॉन टर्नरच्या हाती ‘अ‍ॅप्पल’

टिम कूक यांना भावपूर्ण निरोप

    दिनांक :22-Apr-2026
Total Views |
न्यूयॉर्क
जगातील सर्वात मौल्यवान टेक कंपनी असलेल्या ‘अ‍ॅपल’मध्ये एका मोठ्या पर्वाचा अस्त होत असून एका नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे. कंपनीने अधिकृत घोषणा करताना म्हटले की, विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक येत्या सप्टेंबरमध्ये आपल्या पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्या जागी कंपनीचे विश्वासू आणि दीर्घकाळचे सहकारी जॉन टर्नस १ सप्टेंबरपासून ही मोठी जबाबदारी स्वीकारतील.
 
john turner
 
२०११ मध्ये स्टीव्ह जॉब्स यांच्यानंतर जेव्हा टिम कूक यांनी पदभार स्वीकारला, तेव्हा अनेकांना शंका होती की ते अ‍ॅपलची तीच जादू टिकवून ठेवू शकतील का? मात्र, गेल्या १४ वर्षांत कूक यांनी केवळ शंकाच मिटवल्या नाहीत, तर अ‍ॅपलला ४ ट्रिलियनची बाजारपेठ बनवून इतिहास घडवला. त्यांच्या काळात अ‍ॅपल वॉच, एअरपॉड्स यांसारखी उत्पादने सुपरहिट ठरली आणि कंपनीचा ‘सर्व्हिसेस’ विभाग नफ्याचा मुख्य स्रोत बनला. कूक पूर्णपणे निवृत्त न होता, ‘एक्झिक्युटिव्ह चेअरमन’ म्हणून कंपनीशी जोडलेले राहतील.

कोण आहेत जॉन टर्नस? 
५० वर्षीय जॉन टर्नस हे अ‍ॅपलसाठी नवीन चेहरा नाहीत. गेल्या २५ वर्षांपासून ते कंपनीच्या ‘हार्डवेअर इंजिनिअरिंग’ विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. आयफोन, मॅक आणि नुकत्याच लाँच झालेल्या ‘व्हिजन प्रो’ हेडसेटच्या निर्मितीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. टर्नस यांची नियुक्ती हे संकेत देते की, अ‍ॅपल आता पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने नवीन तांत्रिक संशोधनावर लक्ष केंद्रित करणार आहे.